BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ डिसें, २०२१

सोलापूर ग्रामीणचा आणखी एक पोलीस लाच घेताना रंगेहात पकडला !

 



करमाळा : लाच लुचपत प्रचंड बोकाळली असतानाच सोलापूर ग्रामीण पोलीस विभागातील करमाळा पोलीस ठाण्यातील आणखी एक पोलीस कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला आहे. 


गेल्या सहा महिन्यात लाच लुचपत प्रकारात वाढ झाल्याचे दिसत असून अनेक मोठे मासे गळाला लागले आहेत. यात पोलीस आणि महसूल विभाग आघाडीवर आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यापासून उप जिल्हाधिकारी, तहसीलदार असे अनेक अधिकारी लाच घेताना सापडले आहेत आणि त्यांचावर कारवाईही झालेली आहे. लाच प्रकरणी भल्याभल्यांना तुरुंगात जाऊन बसावे लागत असतानाही लाच घेण्याचे प्रकार काही कमी होत नाहीत. पोलीस विभागाने तर सगळ्याच मर्यादा ओलांडलेल्या दिसत आहेत. गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच मागण्याचे आणि ती स्वीकारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत पण फिर्याद दाखल करून घेण्यासाठीही लाचेची मागणी केली जात असलाच धक्कादायक प्रकार करमाळा येथे उघडकीस आला आहे. 


करमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक गोरख ढाकणे याच्याविरोधात लाच स्वीकारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी एका महिलेला या पोलीस नाईकाने एका ३५ वर्षीय महिलेकडे तब्बल २० हजार रुपयांची लाच मागितली आणि ती स्वीकारलीही. करमाळा पोलीस ठाण्याकडे नेमणुकीस असलेल्या गोरख आप्पा ढाकणे याने एका महिलेला केवळ फिर्याद दाखल करून घेण्यासाठी  ही लाच मागितली. तक्रारदार पोलीस ठाण्यात आपली तक्रार घेऊन गेल्यावर ती दाखल करून घेणे हे पोलिसांचे कामच असते. त्यासाठीच त्यांची नेमणूक असते पण या महिलेकडे एवढ्या सामान्य बाबीसाठी तब्बल २० हजार रुपयांची मागणी या पोलिसाने केली होती. 

हे वाचाच ! > पंढरपूर तालुक्यातील भावंडाची हृदयद्रावक कहाणी ! मृत्युनंतर इच्छा पूर्ण !

पोलीस नाईक ढाकणे याने सदर महिलेकडे त्याने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती पण तडजोड होऊन ती २० हजार ठरली. त्यातील पहिला हप्ता म्हणून १० हजार स्वीकारण्याचे त्याने मान्यही केले. लाच देणे अमान्य असल्यामुळे या महिलेने सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि आपली तक्रार दिली. या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. याप्रकरणी पोलीस नाईक ढाकणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यातच लाच प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकास अटक करण्यात आली होती. दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आरोपीच्या पत्नीला अटक न करण्यासाठी पोलीस नाईक शशिकांत वलेकर याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती आणि त्यातील ७ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले होते.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !