BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० डिसें, २०२१

हाय अलर्ट ! मुंबईवर उद्या दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता !






मुंबई : मुंबईवर उद्या खलिस्तानी दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झाली असून मुंबई पोलीस अत्यंत सतर्क झाले आहेत.  



मुंबई आणि दहशतवादी हल्ला म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो. पाकिस्तानी अतिरेक्यानी २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत केलेला अतिरेकी हल्ला शेकडो वर्षे विसरला जाणार नाही तोच पुन्हा अशा हल्ल्याची कुणकुण केंद्रीय यंत्रांना लागली आणि अवघी यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांच्या उद्याच्या साप्ताहिक  आणि इतर सगळ्याच सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस अत्यंत दक्ष झाले असून मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

खलिस्तानी दहशतवादी हा हल्ला उद्या करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रांना प्राप्त झाली आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या उद्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, वांद्रे, चर्चगेट, कुर्ला तसेच अन्य रेल्वे स्थानकावर अत्यंत कडेकोट बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तीन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी उद्या तैनात करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत १४४ कलम लागू करण्यात आलेले आहे त्यातच गुप्तचर यंत्रणांना दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली असल्याने हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !