BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० डिसें, २०२१

अखेर आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

 



शिवसेनेने फोडले फटाके !


सिंधुदुर्ग : भाजपचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिरंजीव नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अखेर सिंधुदुर्ग सत्र  न्यायालयाने नामंजूर केला असून शिवसेनेने जल्लोषात या निर्णयाचे स्वागत केले 

शिवसेनेचे संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांची पोलीस चौकशी करीत होते. चौकशीसाठी बोलावल्यानंतर आ. नितेश राणे हे दोन वेळा पोलिसात हजर झाले परंतु त्यानंतर ते हजर झाले नाहीत त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या अटकेच्या हालचाली सुरु केल्या. त्यानंतर मात्र राणे हे नॉट रिचेबल झाले आणि अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. नेहमी मोठी विधाने करणारे नितेश राणे पोलिसांपासून लपत असल्याने त्यांच्यावर मोठी टीकाही झाली आणि न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून अटकपूर्व जामिनाबाबत सुनावणी सुरु राहिली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापल्या बाजू जोरदारपणे न्यायालयात मांडल्या . 

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील कोकणात ठाण मांडून होते आणि त्यांनी नितेश राणे कुठे आहेत हे मी सांगणार नाही असे विधान पत्रकार परिषदेत केले होते त्यामुळे पोलिसांनी त्यानाही साक्षीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस दिली  होती. राणे कुटुंबामुळे भाजप अडचणीत येत असल्याची चर्चा नेहमीच होत असली तरी भाजप राणे यांच्या मागे उभी राहिली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग, कणकवली परिसरातील वातावरण तापलेले असतानाच आज आ. नितेश राणे यांच्याबाबतचा निकाल आला आणि न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राणे आणि भाजपची पुरती कोंडी झाली आहे. शिवसेनेने मात्र हा निर्णय येताच जल्लोष केला आहे.

आ. नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केलेली नक्कल विधानसभेत चांगलीच गाजली आणि  त्यानंतर दररोज त्यांची अटक की अटकपूर्व जामीन ? हा विषय गाजत आहे. राज्यातील राजकीय वातावरण या प्रकरणाने ढवळून निघाले आणि संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या जामीन अर्जाच्या निकालाकडे लागलेले होते. अखेर न्यायालयाने आज या अर्जावर निर्णय दिला. नितेश राणे यांचे समर्थक या निकालावर प्रचंड नाराज आहेत कारण राणे यांना जामीन मिळेल अशी त्याची अपेक्षा होती. राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावं अशी अपेक्षाही यावेळी न्यायालयाने व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे राणे यांच्या वकिलांनी या निकालानंतर सांगितले. आम्ही अपील करू पण पोलिसात हजर होण्याची गरज नाही. आपल्या निर्णयात न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे हे पाहून पुढील दिशा ठरवली जाईल असे आड संग्राम देसाई यांनी सांगितले.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !