• Home
  • About Us
  • Contact
  • Privacy policy
  • Dsclaimer
  • Sitemap

SHODH NEWS
  • Home
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • अपघात
  • विशेष

BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ डिसें, २०२१

Home / कोरोना /

पंढरपूर विठ्ठल मंदिर होणार रात्री लवकरच बंद !

by शोध न्यूज on डिसेंबर २६, २०२१ in कोरोना




पंढरपूर :  ओमीक्रॉन व्हेरिएंटचे परिणाम हळूहळू सगळीकडेच होताना दिसू लागले असून आता पंढरीचे विठ्ठल मंदिरही रात्री ९ वाजताच भाविकांसाठी बंद होणार आहे. 


कोरोनाच्या आक्रमणामुळे विठ्ठल मंदिर जवळपास दीड वर्षे बंदच होते आणि भाविक आणि विठूमाऊली यांच्यात कोरोनाची मोठी भिंत सतत उभी होती. आषाढी कार्तिकी यात्रेसारख्या मोठ्या यात्राही पारंपरिक पद्धतीने झाल्या नाहीत. प्रतीकात्मक यात्रा साजऱ्या कराव्या लागल्या आणि भाविकांना विठूमाऊलीचे दर्शन मिळणे बंद झाले होते. कोरोनाचा प्रभाव कमी होत जाताच भाविकांना विठूमाऊलीचे साजरे स्वरूप डोळा भरून पाहायला मिळाले पण केवळ मुखदर्शन असल्याने लांबुनच भाविकांना समाधान आणावे लागले. मंदिर लवकर सुरु व्हावे ही भाविकांची अपेक्षा होती पण कोरोनाची परिस्थिती ओळखून भाविकांनी देवाचा विरह सहन केला. काहींनी मंदिराच्या नावाने राजकारणही केले पण हे राजकारण ओळखले आणि प्रतीसादही दिला नाही. 


कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत जात असतानाच पुन्हा ओमीक्रॉन या नव्या व्हेरिएंटने झोप उडवली असून शासन हळूहळू एकेक निर्बंध लावू लागले आहे. नुकतेच शासनाने राज्यभर काही निर्बंध लागू केले असताना आता विठ्ठल मंदिर प्रशासनानेही मंदिराच्या संदर्भात दर्शनाच्या वेळेवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डी येथील साई संस्थानने अशाच प्रकारचा निर्णय घेतला असताना आता पंढरपूर विठ्ठल मंदिराबाबतही विठ्ठल मंदिर प्रशासनाच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला आहे. रात्री ९ वाजताच विठ्ठल मंदिर आता भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहे. 


देशात आणि राज्यात ओमीक्रॉनचा प्रभाव वाढत असल्याने शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यात गर्दी न जमणे याला अधिक महत्व दिले आहे. सद्या नाताळाच्या सुट्ट्यांमुळे पंढरीत गेल्या काही दिवसांपासून गर्दी झाली आहे. त्यात नवीन वर्ष येण्यास चार पाच दिवस शिल्लक आहेत. नववर्षाच्या निमित्ताने विठूमाउलीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राज्यासह सोलापूर जिल्ह्यातही रात्रीची जामावाबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही तसा आदेश काढला आहे. रात्री ९ नंतर मंदिर भाविकांसाठी खुले ठेवल्यास या नियमांचा भंग होणार आहे. त्यामुळे या आदेशाच्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाने रात्री ९ नंतर मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्रीचे ९ वाजण्यापूर्वीच भाविकांना मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे. रात्री ९ वाजता किंवा त्यानंतर येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.


हे वाचाच : >> अक्षता पडण्यापूर्वीच पंढरपूर तालुक्यात रोखला बालविवाह ! 

वाचा :>> कट्टर शिवसैनिकाने दिला मुख्यमंत्र्यांसाठी आपला जीव !





Tags # कोरोना
Whatsapp
Author Image

About शोध न्यूज
Chief Editor of SHODH NEWS

Related Posts:
कोरोना
By शोध न्यूज at डिसेंबर २६, २०२१
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Tags: कोरोना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)

A

FEATURE POST

हे देखील वाचा : क्लिक करा

Recent Posts Widget

Follow Us

  • Follow on Twitter
  • Like on Facebook
  • Subscribe on Youtube
  • Follow on Instagram

Facebook

Blogger द्वारे प्रायोजित.

लेबल

  • अपघात
  • कोरोना
  • क्राईम
  • खेळ
  • टेक
  • देश - परदेश
  • पंढरीची वारी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • लेख
  • वेगळी बातमी
  • साहित्य
  • सोलापूर जिल्हा
शोध न्यूज! परखड, सविस्तर आणी नेमकी बातमी!

गैरवर्तनाची तक्रार करा

  • Home
माझा फोटो
शोध न्यूज
प्रोफाइलला भेट द्या

Featured post

भयंकर ! एका आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा गुदमरून झाला मृत्यू !

शोध न्यूज :  आज सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे आगीच्या घटना घडल्या असून, संभाजी नगर येथे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा ...

Recent

Blog Archive

  • एप्रिल (4)
  • मार्च (1)
  • फेब्रुवारी (15)
  • जानेवारी (41)
  • डिसेंबर (32)
  • नोव्हेंबर (51)
  • ऑक्टोबर (21)
  • सप्टेंबर (36)
  • जुलै (14)
  • जून (9)
  • मे (44)
  • एप्रिल (3)
  • मार्च (51)
  • फेब्रुवारी (74)
  • जानेवारी (119)
  • डिसेंबर (82)
  • नोव्हेंबर (88)
  • ऑक्टोबर (143)
  • सप्टेंबर (159)
  • ऑगस्ट (170)
  • जुलै (48)
  • जून (80)
  • मे (110)
  • एप्रिल (153)
  • मार्च (168)
  • फेब्रुवारी (182)
  • जानेवारी (231)
  • डिसेंबर (95)
  • नोव्हेंबर (44)
  • ऑक्टोबर (33)

Recent Post

अलीकडील बातमी

Recent Posts Widget

फॉलोअर

Recent In Internet

"शोध न्यूज” या मराठी वेब पोर्टलवरून प्रसिद्ध होणारा मजकूर अथवा त्याचा काही भाग, छायाचित्र, ध्वनीचित्रफीत याचा पूर्वपरवानगीशिवाय कोणीही कोठेही कशासाठीही वापर करू नये. तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या वेबपोर्टलवरील सर्व हक्क राखून ठेवले आहेत # पंढरपूर न्यायालयाच्या कक्षेत # या वेबपोर्टलवरून प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. मुख्य संपादक : अशोक गोडगे, सोलापुरे नगर, टाकळी रोड, पंढरपूर .... भ्रमणध्वनी – ९४२०१२८०८०. email : ashokgodage@gmail.com

Popular

  • कुस्तीच्या सरावाने पंढरीतील पैलवानाचा मृत्यू !
    कुस्तीच्या सरावाने पंढरीतील पैलवानाचा मृत्यू !
      ✪ मोठी बातमी !✪ राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर ....... ईडीकडून करण्यात आली होती अटक ... ...
  • राष्ट्रवादीच्या आमदारांना 'सेक्सटॉर्शन' मध्ये अडकविण्याचा डाव उधळला !
    राष्ट्रवादीच्या आमदारांना 'सेक्सटॉर्शन' मध्ये अडकविण्याचा डाव उधळला !
      शोध न्यूज : राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना 'सेक्सटॉर्शन' मध्ये अडकविण्याचा डाव उघडकीस आला असून याप्रकरणी ( Sextortion)  एकाल...
  • पंढरपूरच्या सरपंचाला ऑनलाईन गंडा !
    पंढरपूरच्या सरपंचाला ऑनलाईन गंडा !
      पंढरपूर : जाहिरात पाहून गाडी खरेदी करण्याच्या प्रयत्न उंबरगाव येथील माजी सरपंचाच्या चांगलाच अंगलट आला असून तब्बल ७५ हजाराचा ऑनलाईन गंडा घा...
  • भीषण अपघातात दोन विद्यार्थी ठार, पाच  जखमी !
    भीषण अपघातात दोन विद्यार्थी ठार, पाच जखमी !
      शोध न्यूज : नारायणपूर येथे बालाजी दर्शनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या गाडीला अत्यंत भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन तरुण विद्यार्थ...
  • भीषण अपघात : पाच भाविकांचा मृत्यू, दहा जखमी !
    भीषण अपघात : पाच भाविकांचा मृत्यू, दहा जखमी !
      शोध न्यूज : नवरात्रीनिमित्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला आणखी एक अपघात झाला असून या अपघातात पाच भाविक जागीच ठ...
  • रावण दहन करताना चाळीस जण भाजून जखमी !
    रावण दहन करताना चाळीस जण भाजून जखमी !
    शोध न्यूज : खुल्या मैदानात रावणाचे दहन करताना अपघात होऊन चाळीस जण जखमी झाल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ...
  • महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अशोक ननवरे !
    महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अशोक ननवरे !
    शोध न्यूज : योग विद्या धाम पंढरपूर चे संस्थापक अध्यक्ष अशोक ननवरे यांची महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे...
  • पाऊस येणार,  सोलापूर जिल्ह्यासह नऊ जिल्ह्यांना अलर्ट !
    पाऊस येणार, सोलापूर जिल्ह्यासह नऊ जिल्ह्यांना अलर्ट !
    पुणे : सोलापूर जिल्ह्यासह नऊ जिल्ह्यांना आजही हवामान विभागाने अलर्ट जारी केला असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक...

Copyright (c) 2021 --SHODH NEWS-- All Right Reserved

Copyright(c)2021SHODH NEWS

Created By SoraTemplates | Distributed By Gooyaabi Templates
"

".