BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ डिसें, २०२१

पंढरपूर तालुक्यात अक्षता पडण्यापूर्वीच रोखला बालविवाह !



पंढरपूर : तालुक्यातील तिसंगी येथे अक्षदा पडून एक गुन्हा होण्याआधीच पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी एक बालविवाह रोखला आहे. 

पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील म्हस्के वस्ती येथे एक बालविवाह होणार असल्याची माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी एका पथकाची स्थापना करून सदर बालविवाह होण्यापूर्वीच पोलिसांनी रोखला आहे. महिला व बालकल्याण समितीचाही या कारवाईत सहभाग होता. प्रत्यक्ष विवाह होण्यापूर्वीच पोलीस आणि महिला बाल कल्याण विभागाचे पथक तिसंगी येथे पोहोचले आणि त्यांनी होणारा विवाह रोखला.  अल्पवयीन नवरी आणि तिच्या आई वडिलांना पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना बालविवाह कायद्याबाबत माहिती देण्यात आली तसेच त्यांचे समुपदेशन केले गेले. असा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे देखील त्यांना समजावून सांगण्यात आले. 

सदर पिडीत मुलगी आणि तिच्या आईवडिलांना महिला व बालकल्याण समितीपुढे हजर करून समिती देईल त्या निर्देशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे. बालविवाह करणे हा कायद्यानुसार गुन्हा असून असा विवाह करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, जर तसा प्रयत्न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असे आवाहन पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी केले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !