पंढरपूर : घरात घुसून चोरी तर केलीच पण जाता जाता घरही पेटवून दिल्याची घटना पंढरपूर शहरातील इसबावी येथे पहाटेच्या सुमारास घडली आहे.
पंढरपूर शहर आणि परिसरात चोऱ्या आता सामान्य झालेल्या दिसत आहेत. सतत कुठल्या न कुठल्या भागात चोरीच्या घटना घडत आहेत. भाविकांच्या चीजवस्तू सुरक्षित नाहीत की नागरिकांच्या घरातील सोने नाणे सुरक्षित राहिलेले नाही. दारात लावलेल्या दुचाकीही चोरून नेत आहेत. अलीकडील काळात हे प्रकार भलतेच वाढीला लागले असून नागरिक भयभीत आहेत. अशा परिस्थितीत इसबावी येथून एक वेगळीच घटना समोर आली आहे.इसबावी येथील शिवाजी नगर परिसरात राहणारे स्टेट बँकेतील निवृत्त कर्मचारी अरुण घोडके यांच्या घरात चोरट्यांनी घुसून चोरी केली आहे. काल मध्यरात्रीनंतर घडलेल्या या प्रकाराने परिसराला धक्का बसला आहे. हा प्रकार केवळ चोरीचा आहे की यामागे अजून काही दडलेले आहे याची उकड पोलीस तपासात होईल.
अरुण घोडके हे कुटुंबासह परगावी गेले असता हा प्रकार घडला आहे. रात्री त्यांच्या घरात चोर घुसले आणि चोरी करून निघून जाताना घर पेटवून दिले. या आगीमुळे घरातील साहित्य, किमती सामान जाळून खाक झाले आहे. त्यामुळे घोडके यांचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत पाहते ही आग विझवली परंतु तोपर्यंत घरातील मोठे नुकसान व्हायचे ते झाले होते. अरुण घोडके यांनी या घटनेबाबत पंढरपूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वाचा : >> देवाच्या पैशावरही मारला डल्ला, फोडली मंदिरातील दानपेटी !
अग्निशामक दलाच्या वाहनाची पळापळ पाहून सकाळीच काही घडल्याची जाणीव झाली होती परंतु या भागात चौकशी करूनही नेमकी माहिती मिळत नव्हती. इसबावी परिसरात अनेकांना या घटनेची माहिती मिळाली नव्हती पण जेंव्हा ही घटना समजली तेंव्हा सगळ्यांनाच धक्का बसू लागला आहे. घरात कुणी नाही हे पाहून चोरी होऊ शकते परंतु जाताना घर पेटवून देण्याचे काय कारण असू शकते ? असाच प्रश्न सर्वाना पडलेला आहे. चोरीचा हा नवाच प्रकार पाहून अनेकांना हादरा बसला असून या प्रकारचा लवकर छडा लागण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !