BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० डिसें, २०२१

राज्यातील आठ बड्या नेत्यांना कोरोनाची लागण !

 



मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट दृष्टीक्षेपात आलेली असतानाच राज्यातील आठ बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याचे या नेत्यांनी स्वतःच जाहीर केले आहे. 


ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या शिरकावामुळे जगभरची झोप उडालेली असताना भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. कोरोना नष्ट होतोय असे वाटत असताना हे नवं संकट येऊ लागले आहे. अत्यंत वेगाने वाढणारा ओमीक्रॉन विषाणू राज्यात आपले हातपाय पसरू लागला आहे. महाराष्ट्रातच याचे रुग्ण अधिक आढळत असून आत्तापर्यंत ही संख्या २५२ वर पोहोचली आहे. या विषाणूने झोप उडवलेली असताना कोरोनाचे रुग्णही झपाट्याने वाढू लागले आहेत. गेल्या काही दिवसातील आकडेवारी पहिली तर ती धक्का देणारी असल्याचे समोर आले आहे. अनेक शहरे कोरोनमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आलेली होती पण तेथेही आता पुन्हा अत्यंत वेगाने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यातच आगामी दोन महिन्यातील परिस्थिती अंत्यत संकटाची असेल असा अंदाज तज्ञ् आणि अभ्यासक करू लागले आहेत. खऱ्या अर्थाने काळजी घेण्याचे हेच दिवस असून कोरोनाला थोपविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आता गरजेचे बनले आहे. 


राज्यातील काही बड्या नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर या अधिवेशनात सहभागी असलेल्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याने आणखी चिंतेची बाब बनली आहे. आठ नेत्यांनी आपल्याला कोरोना झाल्याचे जाहीर केले आहे पण आणखी किती नेत्यांपर्यंत हा विषाणू पोहोचला आहे याची माहिती हळूहळू बाहेर येण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि वेगाने प्रसार होत आहे त्यावरून ही धोक्याची घंटा मानली जात असून तिसऱ्या लाटेची सूचना घेऊन तर हे विषाणू पुढे आले नाहीत ना ? असे वाटावे इतपत परिस्थितीत बनताना दिसू लागली आहे. 


कोरोनाची लागण झालेल्या बड्या नेत्यात आमदार, मंत्री, राज्यमंत्री, नेते यांचा समावेश झाला आहे. एकाचवेळी एवढ्या नेत्यांना कोरोनाची बाधा होण्याची ही पहिलीच वेळ असावी. भाजपचे आमदार समीर मेघे याना २५ डिसेंबर रोजी कोरोना झाल्याचे आढळून आले तर त्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी याना कोरोना झाल्याचे २७ डिसेंबर रोजी आढळून आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड या देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. २८ डिसेंबर रोही त्यांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कालच २९ डिसेंबर रोजी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे या दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. राज्याचे राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे याना कोरोना झाल्याची माहिती त्यांनी कालच दिली आहे.  माजी मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपणास कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. 



भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येचा विवाह नुकताच संपन्न झाला असून  या विवाह सोहळ्यासाठी राज्यातील अनेक बडे नेते उपस्थित होते. आता हर्षवर्धन पाटील हेच कोरोनाबाधित झाले असून त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे आणि आपल्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना तपासणी करून ग्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.  भारतीय जनता पक्षाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनाही आता कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आजच आमदार मिसाळ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.


वाचापंढरपूर : इसबावीत चोरट्यांनी चोरी करून घर दिले पेटवून !  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !