BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ डिसें, २०२१

संचारबंदी ! राज्यात आता पुन्हा लागू शकतात कडक निर्बंध !


मुंबई : राज्यात कोरोना रुग्णात होत असलेल्या वाढीमुळे आता निर्बंध अटळ असून रात्रीची संचारबंदी लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नव्या निर्बंधाबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.

कोरोना परत निघाला आणि संभाव्य तिसरी लाट केवळ चर्चेतच विरुन गेली असे वाटत असतानाच ओमीक्रोन या नव्या व्हेरीएंटने झोप उडवली आहे. काही देशात पुन्हा हाहा:कार माजविण्यास सुरुवात केली आहे तर देशातही या विषाणूने दमदारपणे शिरकाव केला आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून प्रचंड दक्ष राहण्याची वेळ आली  आहे. शासन आणि प्रशासन अत्यंत सतर्क झाले आहेत आणि उपाययोजनाबाबत नियोजन केले जात आहे. निर्बंध म्हटले की नागरिकांच्या अंगावर आता काटा उभा राहू लागला असून जनतेने गेल्या दोन वर्षात खूप काही सोसले आहे. अर्थचक्र कोरोनाच्या गाळात रुतून बसले असून त्यातून सावरायला आणखी बराच काळ जावा लागणार होता. त्यात पुन्हा पहिलीच परिस्थिती येऊ घातली आहे त्यामुळे अधिक चिंता व्यक्त होत आहे. 

नागरिकांना निर्बंध नकोसे असले तरी त्यांच्याच भल्यासाठी शासनाला हे कठोर पाउल उचलावे लागत आहे. राज्यातील परिस्थिती पाहून शासन आणि प्रशासन अत्यंत दक्ष असून समोर नाताळ आणि नवीन वर्ष दिसत आहे. गर्दी झाली तर धोका नक्कीच आहे त्यामुळे शासनाला काही कठोर निर्णय घेणे अपरिहार्य आहे. राज्यात रोज कोरोना रुग्णांची १८ टक्क्याने वाढ होत आहे त्यामुळे संभाव्य तिसरी लाट जवळ दिसत आहे. एकूण परिस्थिती पाहता लवकरच कडक निर्बंध लागू होण्याचे संकेत अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक यांनी दिले आहेत.   आज टास्क फोर्सची एक महत्वाची बैठक पार पडली आहे.  यात नाताळ, नाविन वर्षाचे स्वागत याच्या निमित्ताने कमीत कमी गर्दी कशी होईल आणि लग्न सोहळे, पार्ट्या याच्या निमित्ताने हॉटेल आणि उपहारगृह येथे होणाऱ्या गर्दीवर कसे नियंत्रण आणता येईल आणि त्यासाठी काय निर्बंध लावले लागतील यावर आज या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. लावण्यात येणाऱ्या निर्बंधाबाबत आजच नवी नियमावली येण्याची शक्यता आहे.  

केंद्र सरकारने तर आधीच राज्यांना सूचना देऊन निर्बंध लागू करण्यास सांगितलेले आहेत.  ओमीक्रोन चा शिरकाव धोक्याचा मानला जात असून त्या अनुषंगानेच शासन पातळीवर चर्चा होत आहे. येत्या १५ दिवसांचा आराखडा बनविण्यात आला असल्याची माहितीही प्राप्त होत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रोन अधिक सशक्त असणार असून त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.  तज्ञांनीही या दोन महिन्याबाबत भाष्य केलेले आहे.  

 अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे संतोष कुलकर्णी यांच्या मातोश्री आणि श्रीमती सविता संजय कुलकर्णी ( आदर्श शाळा सहशिक्षिका ) यांच्या सासूबाई श्रीमती वासंती माणिक कुलकर्णी  यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ! कुलकणी परिवारास हा आघात सहन करण्याचे धैर्य मिळो !

-----------------

कोरोना प्रदुर्भावात  ताप येणे, खोकला, वास न येणे आणि चव जाणे अशी लक्षणे सराश्रुत असली तरी या नव्या विषाणूची लक्षणे वेगळी असू शकतात असे तज्ञांनी सांगितले आहे. काहीना सौम्य लक्षणे तर काहीना ताप येण्याची लक्षणे जाणवत आहेत. घसादुखी, अंगदुखी. थकवा अशीही लक्षणे आहेत. असे असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मागील तुलनेत कमी आहे. असे असले तरी वाढते रुग्ण पाहून राज्यात निर्बंध लावण्याचा विचार झाला असून आजच ही नवी नियमावली घोषित होण्याची शक्यता आहे.   

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !