BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ डिसें, २०२१

तिसरी लाट आली ! आता लवकरच लॉकडाऊन ... मंत्र्यांची माहिती


 -----------------------

काळजी घ्या, दक्ष व्हा !

-------------



मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे चित्र दिसत असताना ही लाट आली असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली असून आता लवकरच लॉकडाऊनही लागू शकते असे संकेत त्यांनी दिले आहेत. 


कोरोनाची दुसरी लाट सुरु असल्यापासून तिसऱ्या लाटेची चर्चा होत होती परंतु कोरोनाची दुसरी लाट संपत आली तरी तिसरी लाट येण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. विदेशात तिसरी लाट आली होती परंतु भारतात आता ही लाट येणार नाही अशी चिन्हे दिसू लागल्याने दिलासा वाटू लागला होता पण अचानक पुन्हा रुग्ण वाढू लागले आणि या वाढीचा वेग पहिल्यापेक्षा अधिक असल्याने अधिकच चिंता निर्माण होऊ लागली. गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईमध्ये तर ही वाढ प्रचंड वेगाने होते आहे. एकाच वेळी सगळीकडे कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने तिसरी लाट सुरु झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता आणि त्यानुसार निर्बंध लागू करणे सुरु झाले होते, असे असतानाच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तिसरी लाट सुरु झाल्याचे सांगितले आहे. मुंबई, दिल्लीच्या काही भागात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असल्याचे टास्क फोर्स सदस्यांनी देखील म्हटले आहे. 


राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले आहे. तिसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्र आता लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा असून लॉकडाऊन लागले तर मुंबई लोकल आणि शाळा तसेच अन्य सेवाबाबत निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रात सद्या लॉकडाऊनची स्थिती येत आहे, कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग वाढला असून तिसरी लाट आली आहे त्यामुळे लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, लॉकडाऊनचे वेळ आलीच तर रेल्वेसह अन्य सेवांच्या बाबतीत निर्णय घ्यावाच लागणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 


कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा संसर्गही वाढू लागला आहे, खबरदारी म्हणूनच विविध सार्वजनिक कार्यक्रम, सभा, समारंभ यावर निर्बंध आणले गेले असून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे. दरम्यान देशातही कोरोनासह नव्या व्हेरीएंटचे संकट देखील वाढू लागले असून देशात गेल्या २४ तासात १३ हजार १५४ कोरोनाबाधित नव्याने आढळले आहे तर ओमयक्रोनचे रुग्ण ९६१ वर पोहोचले आहेत. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या या विधानांमुळे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचक इशाऱ्यावरून आता लॉकडाऊन फारसे दूर नसल्याचेच संकेत मिळत आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी, विविध निर्बंध यामुळे गेल्या दोन वर्षापासून जनता हैराण झाली असून जीवनाचे सगळे गाडेच कोलमडून पडले आहे. अशा स्थितीत आता हे निर्बंध न परवडणारे पण टाळता न येणारे ठरणार आहेत.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !