BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ डिसें, २०२१

मोठा अपघात ..कारवर चढला कंटेनर, चार जण जागीच ठार !


एकाच कुटुंबावर 

मोठा आघात !




उस्मानाबाद : उस्मानाबाद - बार्शी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले असून एका कारवर कंटेनर चढून हा मोठा अपघात झाला आहे. 


उस्मानाबाद शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर उस्मानाबाद - बार्शी मार्गावर ट्रक्टर घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला कारने जोराची धडक तर दिलीच पण हा कंटेनर थेट कारवर (एम एच २४ ए ए ८०५५) चढला आणि कारमधील एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले. उस्मानाबाद जवळच असलेल्या आळणी गावाच्या परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि कार यांच्या झालेल्या धडकेनंतर कंटेनर थेट कारवर चढला आणि कारमधील एकाच कुटुंबातील चार जण जागेवरच मृत्युमुखी पडले आहेत. ठार झालेले चारही प्रवासी लातूर येथील आहेत. 


या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून अन्य एक व्यक्ती जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे परंतु हा व्यक्ती कार मध्ये होता की कंटेनरमध्ये होता याची माहिती मिळू शकली नाही. अपघातातील कार ही लाटून येथील असल्याची माहिती मात्र मिळाली आहे. उस्मानाबाद, लातूर, हिंगोली औरंगाबाद या जिल्ह्यात नेहमीच आणि मोठे अपघात होतात, गेल्या चार पाच दिवसात तर या परिसरातील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अपघाताचे छायाचित्र पाहूनच हा अपघात किती भयानक आणि भीषण होता याची सहज कल्पना येते.

 

वाचा : >> आमदार हरवलेत, शोधून दिल्यास एक कोंबडी बक्षीस !


अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. उस्मानाबाद शहरापासून जवळच हा अपघात झाला असल्याने उस्मानाबाद येथून अनेकजण घटनास्थळी पोहोचले तर परिसरातील अनेक नागैर्कानी ये ठिकाणी धाव घेतली. एकाच कुटुंबातील चौघांचा बळी या अपघाताने घेतला असल्याने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !