समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत असलेली विधाने अत्यंत धक्कादायक आहेत. "एखाद्या सरपंचाने पंधरा लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला असला तर माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ नका, पंधरा लाखांच्या वर भ्रष्टाचार केला असेल तर तक्रार करा. सरपंचांचे ७ लाख रुपये निवडणुकीवर खर्च झालेले असतात आणि पुढील निवडणुकीसाठी ७ लाख खर्च होणार असतात. महागाई वाढतेय तर आणखी एक लाखाची भर घाला. ही वस्तुस्थिती आहे" अशी धक्कादायक विधाने ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे हे 'ना खाउंगा, ना खाने दुंगा' नव्हे तर ' खाओ और खाने दो' असाच प्रकार दिसून येऊ लागला आहे. ही विधाने ऐकून कुणाही भारतीयाला धक्का बसल्याशिवाय राहत नाही.
वादग्रस्त विधाने !
मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे खासदार जनार्दन मिश्रा हे या आधीही चर्चेत आलेले असून त्यांची विधाने वादग्रस्त राहिलेली आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दादीतून पंतप्रधान आवास योजनेची घरं येतात, जोपर्यंत मोदींची दाढी आहे तोपर्यंत घरं मिळत राहतील' असे विधानही त्यांनी यापूर्वी केले होते. पोलिसांच्या बाबतीतही त्यांनी असेच वादग्रस्त विधान केले होते आणि त्याची चर्चाही खूप झाली होती.'काँग्रेस किंवा पोलिसांचा कोणीही व्यक्ती शेतकऱ्याकडून वसुली करण्यासाठी आला तर त्याचे हात तोडून टाकू, त्याला गुदमरून ठार करू' असे धक्कादायक विधानही त्यांच्या नावावर आहे.
वाचा > क्लिक करा >> मरणापुर्वीच 'तेरावा' ! पोलीस अधिकाऱ्याचे निमंत्रण !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !