BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ डिसें, २०२१

तुंगतजवळ विचित्र अपघात : पंधरा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती!!

 


पंढरपूर : पंढरपूर- मोहोळ रस्त्यावर झालेल्या विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चार वाहनात हा अपघात झाला आहे. 


प्राप्त माहितीनुसार तुंगत जवळ झालेल्या या अपघातात एका क्रुझर गाडीने रिक्षाला कट मारल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  एम एच १४ बी ०२२८ ही गाडी ओमनीला धडकली आणि ओमनी गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एम एच १३ सी टी ८३३३  या रिक्षातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. क्रुझर, ओमनी आणि एक रिक्षा अशा तीन वाहनांचा हा अपघात असून अपघातावेळी एक दुचाकीस्वार येऊन तो ही धडकला आणि जखमी झाला आहे. हा अपघात होताच ग्रामस्थ तातडीने धाऊन आले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.   अपघातातील ओमनी गाडी माळशिरस तालुक्यातील खुडूस या गावाची असल्याचे समजते. 


अधिक माहितीबाबत पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांनाच या अपघाताबाबत फारशी माहिती नसल्याचे दिसून आले. सदर अपघात चार गाड्यात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.  एकादशीसाठी आलेल्या भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी निघाले असताना हा अपघात झाला असल्याचीही माहिती मिळत आहे.  प्रत्येक सूत्राकडून वेगळी माहिती हाती येत आहे त्यामुळे अपघातात नक्की काय घडलेय याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.  झालेला अपघात मात्र अत्यंत विचित्र असून यात चार वाहनांचा समावेश आहे.


अधिक सविस्तर आणि अपडेटेड बातमी पाहण्यासाठी खालील निळ्या रंगाच्या ओळीवर क्लिक करा !

  click  करा : तुंगत अपघात : रक्ताचा सडा, किंकाळ्या आणि आकांत !  


अपघाताबाबत नेमकी माहिती मिळणे हे कठीण झाले असून माळशिरस तालुक्यातील आठ जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे तर केवळ एका जखमीला सोलापूर येथे हलविण्यात आल्याचेही सांगितले जात आहे,  नक्की किती ठार झाले ? कुणी ठार झाले की नाही झाले ? याबाबत ठाम काहीच माहित लगेच मिळत नसून तीन महिला ठार झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे परंतु याबाबत निश्चित माहिती हाती आलेली नाही.  तीन ठार झाले असल्याचे सांगितले जात असले तरी केवळ एकच व्यक्ती गंभीर असून मयत झाल्याची कुठलीही माहिती अधिकृतरित्या हाती आलेली नाही. रात्री साडे दहा वाजून गेले  तरी माहिती उपलब्ध होत नाही एवढा संभ्रम निर्माण झाला आहे.   अधिक आणि अधिकृत तपशील हाती येताच वृत्त अपडेट केले जाईल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !