BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० डिसें, २०२१

पंढरपूर येथून परतणाऱ्या भाविकांची कार जळून खाक !

 



पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत निघालेल्या भाविकांच्या कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणात ही गाडी जळून खाक झाल्याची थरारक घटना पंढरपूर - मिरज मार्गावर  घडली .


गेल्या काही दिवसांपासून चालत्या वाहनांना आग लागण्याचे प्रकार वाढीला लागलेले आहेत. उन्हाळ्यात गाडीने पेट घेण्याच्या घटना घडतात पण सद्या हिवाळ्याचे दिवस असून थंडीचा कडाकाही वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत कारला आग लागण्याची ही घटना घडली आहे. या आगीने आर्थिक नुकसान केले असले तरी सुदैवाने जिवितहानी झाली नाही. चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.  सांगोला ते अजनाळे या दरम्यान चालत्या कारला आग लागण्याची ही घटना घडली. 


सांगोला तालुक्यातील अजनाळे येथील मारुती आनंद कोळवले, जनाबाई दत्तात्रय येलपले, सुनिता श्रीकांत कोळवले हे एम एच १० डी ए २४४६  या कारमधून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आले होते. दर्शन करून परत निघालेले असताना कमलापूर गावाच्या जवळ आल्यानंतर चालकाने धूर पहिला. गाडीच्या बॉनेटमधून हा धूर येत असल्याचे दिसताच चालक अभिमन्यू येलपले यांनी त्वरित गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. याच दरम्यान गाडीने पेट घेतला. चालकाने गाडीतील सर्वाना खाली उतरण्यास सांगून स्वतः खाली उतरले. त्यानंतर काही क्षणात या आगीने भयावह स्वरूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण कार आगीच्या ज्वाळांनी लपेटून गेली. 


चालक येलपले यांनी गावातील काहींशी संपर्क करून मदत मागितली आणि ही मदत त्यांना तातडीने मिळालीही पण आटोकाट प्रयत्न करूनही ही आग विझत नव्हती. बागेवर औषध फवारणी करण्याच्या दोन ब्लोअरने पाणी मारूनही आग आटोक्यात आलीच नाही. ही आग विझविण्यासाठी अनेकजण शर्थीने प्रयत्न करीत राहिले पण आगीवर काहीही परिणाम झाला नाही आणि आग आटोक्यात येऊ शकली नाही. लोकांच्या डोळ्यादेखत अवघ्या अर्ध्या तासात कार पूर्णपणे जाळून खाक झाली. या घटनेत गाडीचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून चालक अभिमन्यू येलपले यांनी सांगोला पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने गाडी बाजूला घेऊन थांबवली त्यामुळे गाडीतील प्रवाशांना कसलीही इजा होऊ शकली नाही. 

हे देखील वाचा : 

मनोरंजन >> 'हे तलवार, दे दे मेरे आठ हजार' ! निर्मात्यांना केले बेजार !

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !