BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ डिसें, २०२१

पान टपरीवाल्याने पळवले 'त्या' पोलिसासह पत्रकारालाही !

 



उल्हासनगर : हप्ता मागायला आलेल्या त्या नकली पोलिसाला अटक करण्यात आली पण त्याचा साथीदार असलेला बोगस पत्रकार मात्र पळून गेला. पैशासाठी पोलीस आणि पत्रकाराचं नाटक त्यांनी केलं खरं पण ते त्यांच्यासाठी बुमरँग ठरलं !


 जेवढे कायदे कडक तेवढे चरण्यासाठी हिरवंगार कुरण मानलं जातं. पोलीस खात्यात तर भ्रष्ट्राचाराची लागण आधीपासून आहेच पण पत्रकारितेलाही याची कीड लागली आहे. पत्रकार म्हणवून घेणारे अनेकजण आजवर खंडणीसारख्या प्रकरणात अडकले आहेत तर कुणी खंडण्या गोळा करता याव्यात म्हणून पत्रकारितेची झूल पांघरतात आणि पत्रकारितेलाच बदनाम करतात. नीटनेटक्या चार ओली लिहिता येत नाही पण पत्रकार म्हणून निर्लज्जपणे मिरवत असतात. अशाच एका तोतया पत्रकाराला आणि नकली पोलिसाला एका पण दुकानदाराने चांगलाच हिसका दाखवला आहे. 


पोलीस आणि पत्रकार म्हटलं की समाजात अवैध व्यवसाय करणारे त्यांना वचकून असतात. याचाच फायदा घेत दोन भामट्यानी पैसे मिळविण्याचे नियोजन केले. दोन भामट्यातील विनोद भोईर हा पोलीस बनला आणि लव सहानी हा दुसरा भामटा पत्रकार बनला. हे नकली पोलीस आणि बोगस पत्रकार मिळून एका पण दुकानात गेले आणि हप्ता वसुली करू लागले. दादू पान स्टॉलवर येऊन त्यांनी आपलं नाटक सुरु केलं. "तू गांजा आणि गुटका विकतोस, आम्ही पोलीस आणि पत्रकार आहोत, तू आम्हाला हप्ता दे नाही तर तुझ्यावर कारवाई करावी लागेल" असा दम ते पान शॉप च्या मालकाला देऊ लागले. हा प्रकार पाहून आणि एकंदर परिस्थितीत पाहता दुकानदाराला या भामट्यांची शंका आली आणि त्याने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. 


पोलीस आणि पत्रकाराचा रुबाब करायला गेले पण दाखविण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हते. ओळखपत्राची मागणी केल्यावर मोठा आव आणणारे दोघेही गोंधळले. दोघांच्याही चेहऱ्यावरचे रंग उडाले आणि अचानक समोर आलेल्या या प्रसंगामुळे काहीसे बुचकळ्यात पडले. पोलीस आणि पत्रकाराचा अभिनय तर करीत होते पण असाही प्रसंग येऊ शकतो याचा त्यांनी विचारच केलेला  नसावा. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या या अडचणीमुळे बावचळला आणि तेवढ्या तयारीचे नसल्यामुळे त्यांचे भांडे फुटले. त्यांची अवस्था पाहून पान दुकानदाराला आलेली शंका रास्त असल्याची जाणीव झाली आणि त्याने थेट या दोन्ही भामट्याना पकडण्याचा प्रयत्न केला. आता मात्र काही खरे नाही हे दोघांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपली मोटारसायकल तेथेच टाकून पळायला सुरुवात केली.  दुकानदाराने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण दोघेही निसटले. पळून जाताना त्यांची दुचाकी मात्र तेथेच राहिली. 


दुकानदाराने या दोघांची तक्रार उल्हासनगर पोलीस ठाण्यात करताच पोलीस असल्याचे भासवणारा भामटा विनोद भोईर याला अटक करण्यात आली तर पत्रकार म्हणविणारा भामटा मात्र पोलिसांना गुंगारा देऊ लागला आहे. पोलीस लवकर त्याच्याही मुसक्या आवळणार असून अशा प्रसंगी नागरिक, व्यापारी यांनी  थेट पोलिसात धाव घेण्याची गरज आहे.   

  

हे वाचा ! >> ओमीक्रॉन ....संचारबंदीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र आणि दिल्ली !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !