BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ नोव्हें, २०२१

'बाबुराव' ला कंटाळले आहेत परेश रावल !



'मी बाबुराव गणपतराव आपटे' एवढं एक वाक्य ऐकलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो 'हेराफेरी' चित्रपटातील भोळा, निरागस बाबुराव ! एक वेगळ्या उंचीवर पोहोचलेला हा चित्रपट आणि परेश रावल या ताकदीच्या अभिनेत्याने साकारलेला बाबुराव गणपतराव आवटे ! बावीस वर्षे झाली या चित्रपटाला .. आजही तेवढाच ताजा तवाना आहे हा 'हेराफेरी' एवढ्या वर्षात प्रेक्षक या बाबुरावला विसरले नाहीत की या चित्रपटाची लोकप्रियता जराशीही कमी झाली नाही. एखाद्या चित्रपटला क्वचितच असं भाग्य लाभतं ! हा चित्रपट एकदा पाहून भागत नाही आणि प्रेक्षकांनीही हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिलेला आहे, आजही तेवढाच आनंद घेतला जातो. 

विनोदी असलेला हा चित्रपट बाबुराव गणपतराव आपटे यांच्यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला हे तर अगदी स्पष्ट आहेच. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल यांची भट्टी अशी काही जमली की प्रेक्षक ना या चित्रपटाला विसरतात ना या त्रिकुटाला ! आजवरच्या सर्वोत्कृष्ठ विनोदी चित्रपटात 'हेराफेरी' चं  नाव अग्रभागी घेतलं जातं . एखादा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला की पुन्हा त्याचा सिक्वल येतो हे अलीकडे चित्रपटसृष्टीत पाहायला मिळू लागले आहे. त्याच नावाचा चित्रपट असतो पण त्याला एक, दोन असं किंवा जुन्या नावाच्या पुढे मागे काही वेगळे शब्द लिहून चित्रपट बनवला जातो. अर्थात पहिला चित्रपट गाजला म्हणजे दुसरा लोकप्रिय होतोच असं नाही. असे 'दुसरे'  कित्येक चित्रपट सपशेल आपटलेलेही आहेत.

हेराफेरी चित्रपट प्रचंड यशस्वी होताच 'फिर हेराफेरी" आला. या चित्रपटातही परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हेच कलाकार होता. आधीच्या 'हेराफेरी' चा हा सिक्वल होता. या चित्रपटातील बाबुराव गणपतराव आवटे ही व्यक्तिरेखा पहिल्या हेराफेरीइतकीच यशस्वी झाली. सन २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा तिसरा भाग कधी येतोय याची प्रेक्षकानाही प्रतीक्षा लागून राहिलेली होती. परेश रावल हे मात्र आता या 'बाबुराव' ला कंटाळले आहेत. परेश रावल यांची एका मुलाखतीत हे स्पष्ट केलं आहे.  हेराफेरीच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरु असतानाचा परेश रावल यांनी या भूमिकेचा आता आपल्याला कंटाळा आला असल्याचे म्हटले आहे. पहिल्या भागात असेलला बाबुराव गणपतराव आपटे यांचा निरागसपणा दुसऱ्या भागात पाहायला मिळाला नाही.

परेश रावल म्हणतात, हेराफेरी चित्रपटाच्या संबंधानं सोशल मीडियावर माझे संवाद आणि मीम्स व्हायरल होतात, मला मात्र आता या सगळ्यांचा कंटाळा आलाय. आता तिसऱ्या भागाची चर्चा सुरु झाली आहे पण असं होत असताना एखाद्या पात्राला निरागसता आवश्यक असते पण ती नव्हती. पहिला हेराफेरीच्या वेळी आम्ही निरागस होतो. दुसऱ्या भागात मात्र हुशारी दाखवत होतो आणि काहीही दुसरे होते.  तोच तो पण कंटाळवाणा वाटतो.  मला आता 'बाबुराव गणपतराव आपटे' या पात्रापासून सुटका हवी आहे.  आता 'बाबुराव गणपतराव आपटे' नकोच नको '!

         

✪✺ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! आमच्या सर्व वाचकांना, जाहिरातदारांना, हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! ✺✪

 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !