BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ नोव्हें, २०२१

आर आर आबांना मृत्यूची जाणीव आधीच झाली होती काय ?




आबांच्या कन्येची पोस्ट 

व्याकुळ झाला महाराष्ट्र


मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर. आर. तथा रावसाहेब रामराव पाटील यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले होते, आता त्यांची कन्या स्मिता पाटील यांनी एका पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आणि अवघा महाराष्ट्र पुन्हा व्याकूळ झाला. 

अत्यंत सामान्य परिस्थितीतील आर. आर. पाटील गावाच्या राजकारणापासून राज्याचे उपमुख्यमंत्री झाले पण त्यांनी आपले साधेपण कधीच सोडले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यामुळे आपण या पदापर्यंत आलो असे ते नेहमीच सांगत राहिले. अत्यंत साधेपण जपणारा हा मोठा माणूस अचानक सर्वाना सोडून गेला आणि त्यांच्या जाण्याच्या बातमीने महाराष्ट्र गहिवरला. असं खूप कमी नेत्यांच्या वाट्याला येते. अवघ्या महाराष्ट्राचे ते आबा बनले होते. 

८ नोव्हेंबरच्या दिवस पुन्हा उगवला आणि  आबांची कन्या स्मिता पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ही पोस्ट प्रयेकाच्या डोळ्यांना ओले करणारी तर आहेच पण ती अंत्यंत वेगाने व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून पुन्हा एकदा महाराष्ट्र व्याकूळ झाला आहे आणि आबांची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. भावनेने ओतप्रोत भिजलेली ही पोस्ट अशी आहे 

"आज ८ नोव्हेंबर. बरोबर ७ वर्षे झाली माझ्या वडिलांना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन ! आजच्या दिवशी २०१४ मध्ये सकाळी ११ वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असे पप्पानी माज्या आजीला सानितले होते. ३ नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पानी घणाघाती भाषण केले होते. या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते. त्यानंतर पप्पा ६ नोव्हेंबरला पप्पा अंजनीला घरी आले. हेलिकॉप्टरमधून सगळं गाव त्यांनी दोनदा फिरून पाहिलं. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करीत असत. मात्र त्या दिवशी पप्पा जाताना लोकांमधून वेळ काढून मी आणि माझी बहिण सुप्रिया हिला भेटण्यासाठी आमच्या रुममध्ये आले. पप्पानी त्या दिवशी वर येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली, त्याक्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आम्ही दोघी बहिणी विचार करू लागलो की पप्पांना काय वाटले असावे की पप्पानी मिठी मारली आणि पप्पांच्या डोळ्यात पाणी का पाणी आले असावे ? पण आम्हाला वाटलेही  नव्हते की आज पप्पानी आम्हाला शेवटचे कुशीत घेतले आहे !'

"त्या दिवशी पप्पानी गावातील मारुती शंकराचे  न चुकता दर्शन घेतले होते. स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबंद्ध्ल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की, स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवटचा सत्कार ठरावा. आता आणखी किती सत्कार करणार ? कदाचित मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का ?"  

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !