BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ नोव्हें, २०२१

अखेर समीर वानखेडे यांची उचलबांगडी !


मुंबई : शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग प्रकरणाचा तपास करणारे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान याच्यासह एकूण सहा प्रकारांतील तपास काढून घेण्यात आला असून आता संजय सिंह हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशातही समीर वानखेडे यांचा विषय गाजत आहे, आर्यन खान प्रकरण आणि वसुली प्रकरण वादात होते. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात रोजच आरोप प्रत्यारोप सुरु होते आणि मलिक यांनी अत्यंत गंभीर आरोप समीर वानखेडे यांना अडचणीत आणले होते. रोज नवे पुरावे सादर करीत होते आणि वानखेडे ते फेटाळून लावत होते. आज मात्र दिल्लीच्या एनसीबीच्या प्रमुख कार्यालयातून वानखेडे यांच्याबाबत आदेश निघाला आणि ' ही तर केवळ सुरुवात आहे" अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली.  

समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर वरिष्ठ पातळीवरून एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. आर्यन खान प्रकरणी तपास निष्पक्ष व्हावा म्हणून वानखेडे यांना हटविण्यात आले असल्याचे एनसीबी कडून सांगण्यात येत आहे परंतु वानखेडे यांच्याकडून एकूण सहा प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप झालेले असून त्यांनी नोकरीसाठी जातीची खोटी कागदपत्रे दिली असल्याचा आरोप करण्यात आला असून याबाबत चौकशी होण्याचीही मागणी झालेली आहे. एकूण प्रकरण गंभीर वळवणार पोहोचले असतानाच वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे. 

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिवाळीनंतर याबाबत मोठे फटाके फोडणार असल्याचे सांगितले आहे. क्रुझ ड्रग प्रकरण आणि छापेमारी हा केवळ प्लान होता इथपासून वानखेडे यांचे कपडे आणि बूट हे विषयही आरोपात आले होते. क्रुझ ड्रग प्रकरणातील पंच यांनीही धक्कादायक बाबी समोर आणल्या होत्या आणि शाहरुख खान याच्याकडून २५ कोटीची मागणी केल्याचा विषय समोर आला त्यामुळे तर प्रचंड खळबळ उडालेली आहे. या सर्व आरोपांची चौकशी सुरु आहेच त्यामुळे समीर वानखेडे अडचणीत येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. आरोपानंतर समीर वानखेडे यांची खात्यांतर्गत चोकशी सुरु करणायत आली आहे आणि त्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे परंतु त्याआधीच वानखेडे यांची तपासातून उचलबांगडी करण्यात आली आहे. आता उद्यापासून आर्यन खान आणि अन्य सहा प्रकरणी संजय सिंह यांची टीम हा तपास करणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांचा विषय वादग्रस्त ठरला असताना आणि नवाब मलिक आणखी काही मोठी फटाके फोडणार असताना वानखेडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. वानखेडे यांच्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वानखेडे यांची बाजू घेतलेली आहे. रविवारी नवाब मलिक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत त्यामुळे आता मलिकांच्या या फटाक्याचा आवाज किती हादरा देतोय हे पाहावे लागणार आहे. बोगस केसेस केल्याचा मुद्दा आणि हिंदी चित्रपट सृष्टीला बदनाम करण्याचा उद्योग सुरु आहे, आता सगळे काही बाहेर आणणारच आहे असे नबाब मलिक यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.

आपल्याला हटविण्यात आले नाही आणि आपली बदलीही झालेली नाही, केवळ आर्यन खान आणि अन्य सहा प्रकरणातील तपास काढून घेण्यात आला आहे, आपणच तशी विनंती केली होती असे समीर वानखेडे यांनी या उचलबांगडीनंतर माध्यमांना सांगितले आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !