BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ नोव्हें, २०२१

पेट्रोलचे दर पन्नास रुपये कमी करायचे असतील तर करावे लागेल हे काम !

 


मुंबई : पेट्रोलचे दर शंभर रुपयांनी वाढवायचे आणि पाच रुपयांनी कमी करायचे ही खेळी असून पेट्रोलचे दर कमी करायचे असतील तर देशभरातून भाजपचा पराभव करावा लागेल असा मार्ग शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितला आहे. 

'अच्छे दिन' आणण्याची स्वप्ने दाखवत आणि महागाई कमी करण्याची आश्वासने देत भाजप सत्तेवर आले आणि 'अच्छे दिन' तर नाहीच पण जनतेचे होते ते भलेबुरे दिन देखील गायब झाले.  प्रत्येक बाबतीत कधी नव्हे एवढी महागाई वाढली आणि भाजपचे नेते याचेही आता समर्थन करीत असल्याने जनतेतील रोष वाढलेलाच आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला सगळीकडे जोरदार आपटी खावी लागली आणि त्यानंतर लगेच पेट्रोल डिझेचे दर कमी करण्यात आले. जनता रोज आक्रोश करताना कुणाच्या कानापर्यंत गेला नाही पण  'दणका' बसताच वठणीवर यावे लागले. असे असले तरी जनतेची समजूत काढण्यापुरतेच दर कमी केले असल्याचे संताप कायमच आहे. 

देशभरात भक्तमंडळी सोडली तर बाकीचे सगळे महागाईने आणि विचित्र धोरणामुळे त्रस्त आहेत . लोकांच्या मनातील भावना सोशल मीडियावर आग ओकत आहे आणि त्यातूनच मनामनातील पडसाद व्यक्त होत आहेत. अत्यंत खालच्या पातळीला जाऊन लोक समाज माध्यमावर वाभाडे काढू लागले आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या निवडणुकांनी भाजपाला ताळ्यावर आणण्याचे काम केले आहे. या निकालांनी जनतेच्या मनातील वास्तव उभे केल्यानंतर डिझेल आणि पेट्रोलचे दर दहा आणि पाच रुपयांनी कमी केले आहेत. या मलमपट्टीचा फारसा उपयोग होणार नाही कारण प्रचंड प्रमाणात दरवाढ करण्यात आली आहे आणि पाच दहा रुपयांनी रडक्याचे डोळे पुसण्याचा प्रयत्न केला आहे. 

इंधन दराच्या कपातीवरून देशभरातून पडसाद उमटले असून शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी मार्मिक टोले लगावले आहेत. पेट्रोलचे दर किमान २५ रुपयांनी कमी करायला हवे होते, केंद्र सरकारचे मन मोठे नाही तर सडके आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढवून केंद्राने बेहिशोबी मालमत्ता कमावली आहे. शंभर रुपयांनी वाढ करायची आणि पाच रुपयांनी कमी केल्याचे दाखवायचे ही खेळी असून पेट्रोलचे दर पन्नास रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा लागेल  असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

'दिल' से नही 'डर' से !  

कॉंग्रेसच्या प्रियंका गांधी यांनीही या तुटपुंज्या दर कपातीवर हल्ला चढवला आहे. " ये दिल से नही, डर से निकला फैसला है... वसुली सरकार की लुट को आनेवाले चुनाव में जवाब देना है l " असे प्रियांका गांधी यांनी महटले आहे.  सणासुदीचे दिवस आहेत आणि सामान्य जनता मात्र महागाईने त्रस्त आहे, लुटण्याची विचारवृत्ती भाजप सरकारची असल्याने महागाई कमी करायची सोडून वाढतच आहे. गॅस, खाद्य तेल, पेट्रोल, डिझेल, किराणा माल असे सगळेच दर प्रचंड वाढले आहेत. वाढत्या दराने आकाशाची उंची गाठली आहे. निवडणूक आली की भाजप एक दोन रुपयांनी दर कमी करते. लोक उत्तर मागणार असून सामान्य जनता तुम्हाला माफ करणार नाही. इंधन दर कपातीचा निर्णय मनापासून नाही तर भीतीतून घेण्यात आला आहे असे गांधी यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही या तुटपुंजा कपातीवर चीड व्यक्त केली आहे. दर कपातीच्या निर्णयाला त्यांनी 'नाटक' असे म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकानंतर पुन्हा इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे. असे लालूप्रसाद यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांनीही प्रतिक्रिया दिली असून 'नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बसलेल्या दणक्यामुळे दर कमी करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.    

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !