सोलापूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरीला गेलेल्या भाविकांना परत जाताना मोठा अपघात झाला असून यात चार ते पाच भाविक ठार झाले आहेत. धावत्या जीपचा पुढील टायर फुटून हा भीषण अपघात झाला आहे.
अक्कलकोट - कुंभारी रस्त्यावर धावत्या जीपचा पुढील टायर फुटला आणि वेगातील जीप उलटून हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोरच्या बाजूस ही दुर्घटना घडली आहे. सदर जीप अक्कलकोटहुन सोलापूरकडे येत होती. या अपघातात चार ते पाच जण ठार झाले असल्याची माहिती असून यात भाविकांचा समावेश आहे. पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर असा प्रवास करणारे काही भाविक या जीपमध्ये होते. सदर जीपमध्ये एकूण आठ जण असल्याची प्राथमिक माहिती असून चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताबाबत अदयाप अधिक माहिती मिळाली नाही परंतु यात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !