BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ नोव्हें, २०२१

अनिल देशमुख यांना घरचं जेवण बंद करणाऱ्या न्यायाधीशांची बदली !




मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरचं जेवण देण्यास नकार दिलेल्या न्यायाधीशांची तातडीने बदली करण्यात आली असून हा आदेश येताच न्यायाधीशांनी मात्र वैद्यकीय रजेवर गेले आहेत. 

राज्याचे गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीसंदर्भात मोठा आरोप करण्यात आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. अनेक दिवस ते ईडीच्या समन्सवर हजार झाले नव्हते पण न्यायालयानेही दिलासा न दिल्याने त्यांना ईडी कार्यालयात हजर व्हावे लागले आणि त्याच दिवशी दिवसभर त्यांना बसवून ठेवत रात्री अटक करण्यात आली होती. 

अनिल देशमुख यांनी प्रकृतीचे कारण देत बेड आणि घरचे जेवण मिळावे यासाठी मुंबई विशेष सत्र न्यायालयात मागणी केली होती. बेड देण्यास परवानगी दिली परंतु घरचे जेवण देण्यास मात्र न्यायालयाने नकार दिला. एवढेच नव्हे तर, 'आधी तुरुंगातील जेवण घ्या' अशा शब्दात फटकारले होते. न्यायालयाच्या या आदेशाची राज्यभर चर्चा होत असतानाच हा निर्णय देणारे न्यायाधीश एच एस सातभाई यांची दुसऱ्याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका न्यायालयात बदली करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १५ नोव्हेंबर रोजी न्या. सातभाई यांची प्रशासकीय कारणास्तव तातडीने बदली करण्यात येत असल्याचा आदेश काढला. त्यांच्या या बदलीला १३ नोव्हेंबर रोजीच सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.  

सातभाई वैद्यकीय रजेवर !

न्यायाधीश सातभाई यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बदलीचा हा आदेश प्राप्त होताच ते लगेच वैद्यकीय रजेवर गेले आहेत. न्यायाधीश सातभाई  यांनी आजवर अनेक बड्या खटल्यात सुनावणी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विद्यमान मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे, अनिल देशमुख यांच्या प्रकरणांची सुनावणी सातभाई यांच्यासमोरच झाली असून छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या पंकज भुजबळ यांची महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याच्या प्रकरणातून त्यांनीच निर्दोष मुक्त केले होते. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीही दाखल केलेल्या अटकपूर्व अर्जाच्या संदर्भातील सुनावणी सातभाई यांच्यासमोरच प्रलंबित आहे.  उच्च न्यायालयाचे महानिबंधक एम. डब्ल्यू चांदवाणी यांच्या सहीने न्यायमूर्ती सातभाई यांच्या बदलीचा निघालेला आदेश मंगळवारी प्राप्त झाला.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !