BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ नोव्हें, २०२१

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे तीन नराधम जेरबंद !




वेळापूर : अल्पवयीनमुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली तीन संशयित नराधमांना वेळापूर पोलिसांनी पुणे जिल्ह्यात पळून जात असताना अटक केली असून त्याना पंढरपूर न्यायालयाने कोठडीत पाठवले आहे. 

माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी अवघ्या १३ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आपल्या कुटुंबियासह माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी येथे राहणारी अल्पवयीन मुलगी सरकारी दवाख्न्याकडे जात होती. यावेळी तीन नराधमांनी तिला रस्त्यात रोखले आणि तिची छेड काढायला सुरुवात केली. त्यानंतर जवळच असलेल्या निर्जन ठिकाणी या मुलीला नेण्यात आली आणि तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले.

सदर अमानवी आणि  राक्षसी कृत्यानंतर या घटनेची माहिती पिडीत मुलीने आपल्या आईला सांगितली. आईने तातडीने पोलिसात धाव घेत वेळापूर पोलीसाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेबाबत बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली.  वेळापूर पोलीसानी गुन्हा दाखल केल्यावर लगेच त्या नराधमांच्या शोधासाठी प्रयत्न सुरु केले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले. दरम्यान संशयित आरोपी पळून जात असताना त्यांना या पथकाने पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे पकडले आणि वेळापूर पोलीस ठाण्यात आणले. 

सदर गंभीर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी युवराज प्रकाश गोडसे (वय २३), रणजीत दत्तात्रय कोळेकर (वय २३), तसेच रोहन दत्तात्रय भोसले (वय १९) यांना अटक केल्यानंतर आज पंढरपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तीनही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सदर तीनही संशयित आरोपी हे उघडेवाडी या गावातीलच आहेत. सदर गुन्हा वेळापूर पोलीस ठाण्यात दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय रेगुडेम पोलीस हवालदार जनार्धन करे, नवनाथ थिटे, विठ्ठल बंदुके यांच्या पथकाने तातडीने आरोपीला पकडण्याची कारवाई मोठया कौशल्याने केली अन्यथा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असते. 

पोलिसांनी तातडीने हालचाल करून शिताफीने माहिती काढून आणि सापळा रचून आरोपींना इंदापूर येथे पकडले. माळशिरस तालुक्यातून आरोपी इंदापूरपर्यंत पोहोचले होते. तेथून ते पुढे पळून जाण्याच्या तयारीत होते. इंदापूर येथून ते निसटले असते तर त्यांच्या मुसक्या आवळायला आणखी काही वेळ लागण्याशी शक्यता होती. तातडीने आरोपी जेरबंद केल्याने पोलिसांची कौतुक होताना दिसत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !