केली तक्रार !
राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक खरे हॅक करण्यात आले असून मुंडे यांनीच याबाबत माहिती दिली असून त्यांनी तशी तक्रारही केली आहे.
अलीकडे फेसबुक हॅक होण्याच्या घटना वाढल्या आहेत, सर्वसामान्य वापरकर्त्याचे फेसबुक खाते अशा प्रकारे हॅक होत असतानाच अलीकडे अनेक मोठ्या पदावरील अधिकाऱ्यालाही हा अनुभव आला आहे. फेसबुक खाते हॅक करून पैसे मागणी करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत पण आता थेट राज्याचे मंत्रीदेखील यातून सुटले नाहीत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक खाते हॅक झाल्याचे मुंडे यांनीच ट्विट करून माहिती दिली आहे.
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि विविध विषयावरील आपली मते ते मोकळेपणे व्यक्त करीत असतात. मुंडे हे फेसबुक सुरु करू पाहत होते पण त्यांना व्यत्यय येत होता. ऍक्सेस मिळत नसल्याने फेसबुक वापरण्यास ते असमर्थ होत होते. त्यानंतर आपले खरे हॅक झाल्याचा त्यांना संशय आला आणि मग त्यांनी सायबर सेलकडे याबाबत तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः ही माहिती दिली असून ट्विट करूनही त्यांनी सूचना दिली आहे 'माझे फेसबुक पेज अज्ञात व्यक्तीने हॅक केला असल्याचा संशय आहे. फेसबुक आणि महाराष्ट्र सायबर सेलकडे याबाबतची तक्रार केली आहे' अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !