BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑक्टो, २०२१

पंढरपूरला निघालेल्या चार भाविकांचा विचित्र अपघातात मृत्यू !



भयावह 

अपघात 



बुलढाणा  : पंढरपूरला निघालेल्या चार भाविकांचा तीन वाहनांच्या विचित्र अपघातात मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. 

अकोला येथून काही भाविक जीपमधून पंढरपूरकडे निघाले होते. मोहाडजवळ आल्यानंतर त्यांच्या जीपला अत्यंत विचित्र अपघात झाला.  माल वाहतूक करणाऱ्या एका जीपने महावितरण कंपनीच्या प्रवासी वाहनाला धडक दिली आणि त्यानंतर या मालवाहू जीपने भाविकांच्या वाहनाला जोराची धडक दिली. एकूण तीन वाहनांच्या झालेल्या या अपघातात पंढरपूरला निघालेल्या चार भाविकांचा अंत झाला आणि पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातात ५५ वर्षे वयाचे शामसुंदर तोकडे, ७२ वर्षे वयाचे विश्वनाथ कराड तसेच शकुंतला कराड (६८), बाळकृष्ण खर्चे (७०) या चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर शामराव ठाकरे, उषा ठाकरे, मुरलीधर रोहणकर, सुलोचना रोहणकर, अलका खर्चे हे पाच जण या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वैरागड गावाजवळ मोहाडी घाटात घाटातील लहानशा वळणावर हा अपघात झाला बोलेरो, बोलेरो पिकअप आणि टाटा सुमो अशा तीन वाहनात झालेला हा अपघात अत्यंत विचित्र होता. अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून टाटा सुमोचा चक्काचूर झाला आहे. जखमीपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.   











   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !