BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑक्टो, २०२१

पंढरपूर शहरात सोळा वर्षीय मुलीवर सात दिवस अत्याचार !

 





पंढरपूर : अल्पवयीन मुलीवर सात दिवस अत्याचार केल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी विकास जाधव नावाच्या तरुणास अटक केली आहे. 

पंढरीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची चर्चा गेल्या दोन दिवसापासून अधिकच होत होती.  पंढरपूर शहरातील एका १६ वर्षे वयाच्या मुलीवर विकास जाधव याने सात दिवस अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या आईने केल्यावर संशयित आरोपीला अटक केली आहे. पीडितेच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असून आई धुणी भांडी करून घर चालवते तर भाऊ मोलमजुरीचे काम करतो. १६ वर्षे वयाची पीडित मुलगी ही पाच महिन्यापूर्वी २७ वर्षे वयाच्या विकास जाधव याच्या संपर्कात आली होती. पीडित मुलगी ही विकास जाधव यांच्याशी बोलत असताना मुलीच्या आईला संशय आला आणि त्यानंतर आईने मुलीला समजावून सांगितले होते. 

यानंतर विकास जाधव हा पीडित मुलीच्या घरी जाऊन तिला घेऊन गेला, त्यानंतर सलग सात दिवस तिच्यावर अत्याचार केला असल्याची फिर्याद पीडितेच्या आईने पोलिसात दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी योग्य तपास करीत विकास जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी जाधव याला अटकही केली आहे. 










   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !