BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० ऑक्टो, २०२१

बेशिस्तपणा विसरा, आता हेल्मेटसाठी ठेवा डोकं तयार नाहीतर -----

✪ सुप्रभात.... शुभ दिन.. शुभ रविवार! आपला आजचा दिवस आनंददायी जावो ✪



मुंबई : आता हेल्मेटसाठी डोकं तयार ठेवा आणि फॅन्सी नंबर प्लेटच्या मोहालाही आवर घाला नाही तर उद्यापासून मोठा फटका सहन करायची तयारी ठेवा असं सांगण्याची वेळ आता आली आहे. 

वाहतुकीची शिस्त पूर्ण बिघडलेली आहे आणि वाहनधारक वाट्टेल तशी मनमानी करू लागले आहेत.  मोटार वाहन कायद्याचा तर पुरता बोजवारा उडाला असल्याचे रोजच दिसत आहे. बहुसंख्य वाहने कसलेही नियम पाळत नाहीत, नव्हे काही कायदे कानून असतात याची त्यांना जाणीवच नसते. वाहन दोन चाकी असो किंवा चार चाकी, वाहनांचे क्रमांक वाचताही येत नाहीत अशा प्रकारची अनेक वाहने रस्त्यारस्त्यांवर पाहायला मिळत असतात. वाहनांच्या क्रमांकाऐवजी दादा, भाऊ, मामा, राज अशी अक्षरे दिसू लागतात. या सर्वांवर आता सोमवार नंतर कायद्याचा बडगा येणार आहे. 

अपघाताचे प्रमाण वाढते असतानाच अपघातातील मृत्यूंचे प्रमाणही वाढते आहे. बहुतेक अपघातातील मृतांनी डोक्यावर हेल्मेट घातलेले नसते असे अनुभवाला येते. महाराष्ट्रात हेल्मेट वापरने बंधनकारक आहे परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आता सोमवारपासून विना हेल्मेट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला आता चांगलाच चाप बसणार आहे. दुचाकीस्वाराला हेल्मेट आणि चार चाकी वाहनात सीटबेल्ट वापरला नाही तर एक हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे.  विना हेल्मेट दुचाकीस्वाराचा परवानाही तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येत्नर आहे

पुढील आठवड्यापासून वाहतूक नियमात मोठे फेरबदल केले जाणार असून या नियमांची अंमलबजावणी लगेच सुरु होणार आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्याची तर खैर नाही. या नव्या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ६ महिने कारावास आणि/ किंवा १० हजार रुपये दंड  आकारण्यात येणार आहे पण दुसऱ्यांदा तोच गुन्हा केला की २ वर्षांचा तुरुंगवास आणि/ किंवा १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. अद्याप याबाबत अधिकृत आदेश आलेले नाहीत. फॅन्सी नंबर प्लेट, रिफ्लेक्टर नसणे, मागील दिवे चालू नसणे, तसेच सीट बेल्ट न वापरणे, यासाठी एक हजार तर वेगाने दुचाकी चालविल्यास आणि परवान्याशिवाय वाहन चालविल्यास २ हजार रुपयांचा दंड आकाराला जाऊ शकतो. 

अपघात कमी व्हावेत आणि वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी आता बारकाईने नजर ठेवण्यात येणार असून मोटार वाहन कायदा २०१९ नुसार  कारवाई कडक केली जाणार आहे. पुढील आठवड्यातच अमलबजावणी पाहायला मिळणार असून सोमवारी याबाबत जाहीरपणे सूचना देण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी आतापासूनच दक्ष राहून हेलमेट, सीट बेल्ट यांची तजवीज करून ठेवायला हवी आहे, अन्यथा दंडाची मोठी रक्कम भरून पावती घेऊन घरी यायची तयारी ठेवायला हवी आहे. 'तळीराम' मंडळीनी तर आता अधिक काळजी घेणे आवश्यक असणार आहे अन्यथा वारंवार तुरुंगातच जाऊन बसावे लागणार आहे. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी आणि अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी मोटार वाहन कायद्याची कडक अमलबजावणी व्हावी अशी मागणी नेहमीच होत असते. आता ती पूर्णत्वाकडे जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच होणार आहे.       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !