BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑक्टो, २०२१

आष्टीचा विठ्ठल नलावडे गेला 'बाराच्या भावात' !



✪➤ पैशाचे आमिष दाखवत अवघ्या सहा वर्षे वयाच्या बालिकेवर अत्याचार ✪➤ नराधम विठ्ठल नलावडे गेला बाराच्या भावात ! ✪➤ न्यायालयाने सुनावली १४ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ! ✪➤बालिकेच्या पुनर्वसनासाठी एक लाख रुपये देण्याचेही आदेश ✪➤ सोलापूर जिल्ह्याला हादरा देणाऱ्या गुन्ह्याचा अखेर निकाल ✪

मोहोळ : पैशाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आष्टीचा नराधम विठ्ठल नलावडे अखेर बाराच्या भावात गेला असून न्यायालयाने त्याला दंडासह १४ वर्षांची शिक्षा सुनावली असून पिडीतेला न्याय मिळाला आहे.  

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी घटना १८ जानेवारी २०१७ रोजी मोहोळ तालुक्यात घडली होती. नराधम विठ्ठल नलावडे याने भर दुपारी केलेले कांड मोठा हादरा देऊन गेले होते. न्यायालयाच्या अंतिम सुनावणीनंतर हे अमानवी वर्तुळ पूर्ण झाले आहे. अवघ्या सहा वर्षाची चिमुकली मुलगी शाळेच्या फाटकाजवळ खेळत असताना विठ्ठल नलावडे या विकृत नराधमाची नजर त्या चिमुकलीवर पडली आणि मोठया घटनेला सुरुवात झाली. 

खेळणाऱ्या चिमुकल्या मुलीकडे पाहून या नराधमाच्या मनात वाईट विचार आले आणि त्याने लगेच त्या ददृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. या चिमुकलीला नराधमाने पैशाचे आमिष दाखवले. समोरचा राक्षस आहे हे सहा वर्षाच्या मुलीला कळण्याचा प्रश्न नव्हता. त्याने पैशाचे आमिष दाखवत या मुलीला एका निर्जन ठिकाणी नेले. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून त्याने या कोवळ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. काहीतरी वेगळे घडतेय याची जाणीव झाल्यापासून ती मुलगी भेदरली होती. मुलीने रडायला सुरुवात केल्यावर तिचा आवाज आजूबाजूला गेला आणि लोक त्या दिशेने धावत आले. त्यानंतर मात्र नराधमाने त्या मुलीला तिथेच टाकून पळ काढला. 

एकटी आणि भेदरलेली मुलगी येथे का रडतेय याचे कोणालाच आकलन झाले नाही. जमलेल्या लोकांनी आणि पिडीतेच्या आईने या मुलीला धीर दिला, समजावले आणि विश्वासात घेऊन विचारले तेंव्हा मुलीने घडलेली घटना सांगितली. मुलीने सांगितलेली घटना ऐकून जमलेले सगळेच हादरून गेले. जमलेल्या लोकांचाही संताप अनावर झाला. मुलीच्या आईने तातडीने या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली आणि मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा आणि पोस्को कायदा यानुसार विठ्ठल नलावडे याच्या विरोधात पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. 

तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांनी  या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी विठ्ठल नलावडे याला दोषी धरले आणि शिक्षा सुनावली आहे. नलावडे यास १४ वर्षांची सक्तमजुरी आणि दहा हजार दंड अशी शिक्षा तर सुनावलीच पण मुलीच्या पुनर्वसनासाठी एक लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेशही केला आहे.  सोलापूर जिल्याला हादरा देणाऱ्या या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा झाल्याने आणि मोहोळ पोलिसांनी योग्य तपास केल्याने पिडीत बालिकेस न्याय मिळाला असून नराधम नलावडे बाराच्या भावात गेला आहे. 

सदर खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, सहायक सरकारी वकील गंगाधर रामपुरे, ऍड. शैलजा क्यातम यांनी तर आरोपीच्या वतीने ऍड. व्ही. डी. फताटे यांनी काम पहिले. २०१७ साली घडलेल्या या गुन्ह्याचा निकाल लवकर आल्यानेही समाधान व्यक्त होता असून पीडित बालिकेस न्याय मिळाल्याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !