BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ ऑक्टो, २०२१

पंढरपूरहून निघालेल्या दुचाकीला एस टी ने उडवले, तरुणाचा मृत्यू !

 


उस्मानाबाद : पंढरपूरवरून औसा तालुक्यात निघालेल्या एका दुचाकीला एस टी ने उडवल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एस टी वर दगडफेकही केली. 

राज्य परिवहन महामंडळाच्या बसची आणि दुचाकीची धडक होऊन पिता आणि पुत्राचा मृत्यू होण्याची दुर्घटना नुकतीच घडली होती. त्यापाठोपाठ पुन्हा राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आणखी एक दुचाकीला उडवले आहे. औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उजनी वळवणार हा अपघात झाला आहे. ग्रामस्थांनी दगडफेक करून आपला संताप वक्त केला आहे. 

पंढरपूर येथून शेषराव वैद्य हे आपले वडील आप्पाराव वैद्य यांना घेऊन दुचाकीवरून (एम एच १३ एजी १०९१) दिवाळीच्या सणासाठी औसा तालुक्यातील चिंचोली काजळे या आपल्या गावी निघाले होते. उजनी वळणावर ते आले असता कवठे महांकाळ - नांदेड या बसने (एम एच १४ टी ४६३५ ) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात आप्पाराव वैद्य हे बाजूला पडून जखमी झाले तर शेषराव वैद्य ( वय ३५ ) एस टी च्या मागील चाकाखाली जाऊन चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सदर अपघात हा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्ता दुरुस्त करण्यासाठी टाकलेल्या मातीमुळे हा अपघात झाला. रस्त्याची दुरुस्ती होऊन महिना झाला तरी ही माती उचलण्यात आलेली नव्हती पण अपघात होऊन एकाचा बळी गेल्यावर मात्र अवघ्या तासाभरात ही माती हटविण्यात आली. आधीच हे काम केले असते तर एक जीव वाचला असता. कुणाचा जीव गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येत नाही असेच या घटनेतून दिसून आले आहे. या अपघातामुळे गावकरी प्रचंड संतप्त झालेले पहायला मिळाले.     











   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !