BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ ऑक्टो, २०२१

सायकलस्वाराला उडवले, माजी मुख्याध्यापकास दोन वर्षे कारावास !

 




माढा : एका सायकलस्वारास चार चाकी वाहनाने उडविल्याप्रकरणी माजी मुख्याध्यापकास दोषी धरून न्यायालयाने दोन वर्षाचा कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली आहे. 

रस्त्यावरील वाहने आणि अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्या तुलनेत अपघात करून दुसऱ्यांच्या जिवावर उठणाऱ्याना शिक्षा होण्याचे प्रमाण कमीच असते. भरधाव वेग आणि बेपर्वा वाहन चालविल्याने रोज कित्येकांचे बळी जात असतात. अशाच एका अपघातप्रकरणी माढा तालुक्यातील माजी मुख्याध्यापकास न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. माढा तालुक्यातील भुताष्टे येथे ५ ऑक्टोबर २०१४ रोजी एक अपघात झाला होता. त्याची सुनावणी होऊन न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. 

महेश उर्फ किसन शामराव यादव हे आपल्या सायकलवरून जात असताना मारुती मंदिर ते जिल्हा परिषद शाळा या रस्त्यावर यादव यांना चार चाकी वाहनाने उडवले होते. या अपघातात यादव यांचा मृत्यू झाला होता.   याप्रकरणी मुख्याध्यापक उत्तम लिंबाजी यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरधाव वेगाने आणि हयगयीने वाहन चालवून एकाच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकारणी उत्तम यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सदर खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने माजी मुख्याध्यापक उत्तम लिंबाजी यादव यांस दोषी धरले आणि दोन वर्षे कारावास आणि चार हजार पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.   

 









   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !