BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० ऑक्टो, २०२१

दुर्दैवी अपघात : सोलापूरचा तरुण पोलीस मृत्युमुखी, सहकारी जखमी !



इंदापूर : सोलापूर - पुणे महार्गावर इंदापूरच्या जवळ झालेल्या अपघातात सोलापूर येथील एक तरुण पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी जखमी झाला आहे. 

पुणे - सोलापूर महामार्गावर सरडेवाडी टोळनाक्याच्या जवळच अपघाताची ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी अक्षय बाळासाहेब साबळे आणि त्याच्या मित्र अक्षय उर्फ मुकेश विजयकांत दुमडे हे दोघे तरुण दुचाकीवरू निघाले होते. अपघात नेमका कसा झाला आणि ते कोठे आणि कशासाठी निघाले होते याची नेमकी माहिती अद्याप मिळाली नसून शासकीय कामानिमित्तच ते निघाले होते असे सांगितले जात आहे.  या  अपघातात अवघे २४ वर्षांचे वय असलेल्या अक्षय साबळे या पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला असून त्याचा २३ वर्षे वयाचा सहकारी मुकेश दुमडे हा जखमी झाला आहे.  मयत अक्षय हा मुलाचा नाशिक जिल्ह्यातील असून सद्या तो सोलापूर येथेच राहतो तर त्याचा सहकारी हा सोलापूर येथील रहिवाशी आहे. 

अक्षय आणि मुकेश यांची भेट झाल्यानंतर बंदोबस्त कामी जात आहे असे सांगून हे दोघे मोटार सायकलवरून ( क्रमांक : एम एच २४ / वाय ५५५ )  सोलापूर येथून निघाले होते. त्यानंतर सोलापूर येथील गॅरेज मेकॅनिक असलेले साबळे यांचे मित्र हिरेमठ याना इंदापूर उप जिल्हा रुग्णालयातून या अपघाताबाबत माहिती मिळाली आहे. त्यानुसार इंदापूर पोलिसात हिरेमठ यांनी या घटनेबाबत खबर दिली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे मित्र इंदापूर पोहोचले. 

अक्षय साबळे हे अत्यंत निष्ठेने आपली ड्युटी निभावत होते आणि आणि त्यांचे वय अवघे २४ वर्षांचे होते त्यामुळे पोलीस दलात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या साबळे यांच्यावरच त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी होती त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. सदर अपघाताबाबत इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

पुणे सोलापूर महामार्ग चकाचक झाल्यापासून या मार्गावरील वाहतूक जशी वाढली आहे तसे या महामार्गावर वाहनांचा वेगही वाढला आहे. साहजिकच अपघातांचे प्रमाणही  वाढलेले असून इंदापूर परिसर, विशेषतः सरडेवाडी टोळ नाक्याचा परिसर हा अपघात क्षेत्र ठरू लागला आहे. यापूर्वीही या परिसरात भीषण अपघात झाल्याची नोंद आहे. त्याच परिसरात पुन्हा हा अपघात झाला आहे. 

राज्यात सगळीकडे रस्त्यांची कामे सुरु आहेत. अर्धवट सोडलेल्या कामामुळे वाहनधारकास रस्त्याची अवस्था कळत नाही. भरधाव वेगाने वाहने येतात आणि एकदम समोर काही धोका दिसतो, अशा वेळी ब्रेक लावूनही वाहने थांबणे शक्य नसते. अर्धवट कामात मातीचे ढिगारे अथवा तत्सम प्रकार तसेच रस्त्यावर सोडलेले असतात. मध्येच दुरुस्तीसाठी खड्डा केलेला असतो परंतु तो अपघात घडवतो याकडे ठेकेदार लक्ष देत नाहीत त्यामुळे सर्रास अपघात होतात आणि वाहन चालकाचे किंवा प्रश्नांचे प्राण जातात. यावर गंभीरपणे उपाय होण्याची आवश्यकता आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !