BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑक्टो, २०२१

पंढरपूर - सांगोला मार्गावर पुन्हा एकदा अपघात !

 


पंढरपूर - मृत्यूचा मार्ग बनलेला पंढरपूर सांगोला रस्त्यावर आणखी एक अपघात झाला असून या मार्गावर अपघाताची मालिकाच सुरु आल्याचे दिसून येत आहे. 

प्राप्त माहितीनीसार पंढरपूर - सांगोला मार्गावर महावितरण केंद्राच्या समोरच्या बाजूस एका दुचाकींचा अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाने धडक देऊन हे वाहन पळून गेले असून दुचाकीस्वार आणि लहान मुलगा असे दोघे जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.  मोटार सायकल  ही दुचाकी पंढरपूरकडून सांगोल्याच्या दिशेने निघाली होती आणि एक अज्ञात वाहन सांगोल्याकडून पंढरपूरकडे येत होते. महावितरण उप केंद्राच्या समोरच्या बाजूस या चार चाकी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली आणि अज्ञात वाहन पंढरपूरच्या दिशेने पळून गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. 


अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असले तरी त्यांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नसल्याने जमलेल्या नागरिकातही संताप व्यक्त होत होता. रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमींना रिक्षातून रुग्णालयात हलवले लागले आहे. या अपघातात मोटार सायकलचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यावर जागोजागी रक्त सांडलेले दिसत होते. न पाहावणारे विदारक चित्र पाहून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करीत आहेत.  


पंढरपूर सांगोला हा मार्ग अलीकडेच सिमेंट काँक्रीटचा आणि रुंद झाला आहे तेंव्हापासून या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत. पंढरपूरपासून सांगोल्यापर्यंत आजवर अनेक अपघात झाले असून अनके जणांचे प्राणही गेले आहेत. या मार्गावरून वाहने अत्यंत भरधाव वेगाने जात असतात आणि अपघाताला निमंत्रण देत असतात. कुणाच्या तरी वेगासाठी निरपराध व्यक्तींचे बळी जाताना दिसू लागले आहेत.  

काही दिवसांपूर्वीच खर्डीजवळ एका दुचाकीला उडवले होते. पठाण वस्ती येथे राहणारे साठ वर्षे वयाचे लतीफ काशीम पठाण आणि मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील फिरोज मकबूल इनामदार हे दोघे दुचाकीवरून निघाले असता असताना अपघात झाला. संगोल्याकडून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या मारुती सुझुकी कारने या दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत दुचाकीवरील पठाण आणि इनामदार दोघेही जखमी झाले. त्यानंतर लगेच आजचा  अपघात झाला.









   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !