BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑक्टो, २०२१

माजी पाक क्रिकेटपटू शोएब अख्तरला दिले हाकलून ! जबर अपमान !!



गोलंदाज म्हणून जगभरात नाव मिळवलेला पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर याला आज घोर अपमानाचा सामना करावा लागला असून एक टी. व्ही. शोमधून त्याला चक्क हाकलून देण्यात आले आहे. 

पाकिस्तान संघातून गोलंदाज म्हणून नाव मिळवलेला शोएब अख्तर याचे अनेक देशात नाव आहे पण ऑन एअर असलेल्या कार्यक्रमात त्याला पाकिस्तानच्याच पीटीव्ही वाहिनीने चक्क त्याला हाकलून दिले आणि हे चित्र नंतर जगातील क्रिकेट रसिकांनी पहिले. त्याचा व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागला आहे. पाकिस्तानी 'पीटीव्ही' या वाहिनीवर 'गेम ऑन' नावाचा शो सुरु असताना अँकरनेच शोएबचा घोर अपमान करून कार्यक्रमातून हाकलून दिले.

पाकिस्तानी माजी गोलंदाज शोएब अख्तरने यात पाकिस्तानचे गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस राऊफ यांचे कौतुक केले. हे दोन गोलंदाज पाकिस्तान सुपर लीगमधील लाहौर कलंदर्स टीममधून पुढे आल्याचे शोएब अख्तरने म्हटले. कार्यक्रमाचा अँकर नौमान नियाज यांनी त्यावर अख्तरला रोखले. पाकिस्तानच्या अंडर-१९ क्रिकेट संघातून शाहीन आला असल्याचे नौमान यांनी म्हटले. शोएबने त्यावर मी हॅरीस राऊफ याच्याबाबत बोलत असल्याचे म्हटले. त्यावर नौमान यांचा पारा चढला आणि त्यांनी शोएब अख्तरचा अपमान करण्यास सुरुवात केली. तू माझ्याशी असभ्य भाषेत बोलत आहेस. मी येथे सांगू इच्छितो की जर तुला ओव्हरस्मार्ट बनायचे आहे तर तू शोमधून निघून जाऊ शकतोस आणि हे मी तुला ऑन एअर सांगत आहे असेही या अँकरने बजावले. 


शोएबचा राजीनामा !


या कार्यक्रमाला ब्रेकनंतर पुन्हा सुरुवात झाली आणि झालेला प्रसंग सावरण्याचा प्रयत्न शोएब अख्तरने केला. पण त्यात काही यश आलेले पाहायला मिळाले नाही. शोएब अख्तरने त्यानंतर शो मधून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मला खूप वाईट वाटले. पीटीव्हीमधून मी माझा राजीनामा देत आहे. राष्ट्रीय वाहिनीवर माझ्यासोबत ज्यापद्धतीने बोलले गेले, ते मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी येथून निघून जात आहे. धन्यवाद, असे म्हणत शोएब अख्तर कार्यक्रमातून निघून गेला. दरम्यान, शोएब अख्तरने त्याच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट करत नेमके काय घडले याची सर्व कहाणी सांगितली आहे. या कार्यक्रमात वेस्ट इंडिजचे दिग्गज विवियन रिचर्ड्स देखील उपस्थित होते. याशिवाय पाकिस्तानचे अनेक माजी खेळाडूही उपस्थित होते. 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !