BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ फेब्रु, २०२४

सोलापूर जिल्ह्यातून मराठा विरोधी माहिती पुरवल्याचा माजी नगराध्यक्षांवर आरोप !

 



शोध न्यूज : मराठा समाजासंबंधी मराठा आरक्षणाचे विरोधक गुणरत्न सदावर्ते यांना सोलापूर जिल्ह्यातून एका राजकीय व्यक्तीने माहिती पुरवली असल्याचा मोठा गौप्यस्फोट मराठा समाजाने केला असून, याबाबत एक फोटो देखील समोर आणण्यात आला आहे. अर्थात संबंधिताने हा आरोप फेटाळला आहे.


मराठा आरक्षणाच्या मागणीची धग मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहोचली असून येणाऱ्या निवडणुकीत या आगीचा धूर दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे जीवाचे रान करीत आहे, त्यांनी आपला जीव डावावर लावला आहे. सरकार राजकीय खेळ खेळत आहे तर विरोधक त्यांना उघडे पाडत आहे. त्यातच सरकारमध्ये असलेले मंत्री छगन भुजबळ हे आक्रमकपणे विधाने करीत आहेत. सत्तेत राहून मुख्यमंत्री आणि सरकार यांच्या विरोधात बोलत सुटले आहेत. भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. अर्थात त्यांच्या राजीनाम्याचा फार्स असल्याचेही विरोधकांनी म्हटले आहे. राजीनामा द्यायचाच तर तो राज्यपाल यांच्याकडे द्यावा असे आव्हान देखील त्यांना देण्यात आलेले आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडून सतत विविध आश्वासने दिली गेली पण त्याची पूर्तता होताना दिसत नाही त्यामुळे आरक्षण मागणी आंदोलन अद्याप संपलेले नाही. 


मराठा विरोधक म्हणून छगन भुजबळ हे आता टार्गेट झाले आहेत तर दुसरीकडे राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जाणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते  हे पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाच्या विरोधात काम करीत आहेत. मराठा समाजाचा ॲड. गुणरत्न सदावर्ते  यांच्या विरुद्ध प्रचंड रोष आहे. त्यांच्या गाड्याही फोडण्यात आल्या होत्या आणि त्यांना मराठा समाजाकडून सतत शिवीगाळ करण्यात येत असते. हे फोन सोशल मीदियावरून व्हायरल देखील होत असतात.याच सदावर्ते यांना मराठा समाजाबाबत माहिती पुरविणारी व्यक्ती सोलापूर जिल्ह्यातील असल्याचा मोठा आरोप समोर आला आहे. मोहोळ येथील माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी ही माहिती ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना पुरवली असल्याचा आरोप मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला आहे.तसेच ॲड. गुणरत्न सदावर्ते, छगन भुजबळ आणि रमेश बारसकर यांचा निषेध या बैठकीत करण्यात आलेला आहे.  


सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा विषय बराच चर्चेचा ठरला आणि काही पदाधिकारी यांनी बारसकर यांचा  गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबतच एक फोटो दाखवला. कुणबी दाखले देण्यासाठी मोहोळ तहसील कार्यालयातून दिरंगाई होत असल्याबाबत मराठा समाजाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचा विषय प्रभावाने समोर आला. यावेळी मराठा समाज पदाधिकारी संतापलेले दिसत होते. मंत्री असलेले छगन भुजबळ, ॲड. गुणरत्न सदावर्ते  आणि मोहोळचे माजी  नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचा अत्यंत तीव्र शब्दात यावेळी निषेध करण्यात आला आहे. (Provided anti-Maratha information from Solapur district)  बारसकर यांचा सदावर्ते सोबतच फोटो पाहून अनेकांना धक्का बसला तर काहींचा संताप अनावर झाला. मोहोळ तालुक्यातून मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात मोठी दिरंगाई होत असल्याबाबत या बैठकीत नाराजी आणि संताप व्यक्त केला गेला. मोहोळ तालुक्यातून पाचशे अर्ज दाखल झाले आहेत पण केवळ दोनशे जणांनाच दाखले मिळाले असून तीनशे अर्ज अजूनही प्रलंबित आहेत याबाबत मराठा समाजाचे संतोष  गायकवाड यांनी लक्ष वेधले.


तो मी नव्हेच !

मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी गुणरत्न सदावर्ते याला माहिती पुरविल्याचा आरोप मराठा समाजाने केला असला तरी, 'तो' मी नव्हेच' असे सांगत बारसकर यांनी हात झटकले आहेत. नगरपरिषद वार्ड रचनेच्या विषयावर आपली आणि सदावर्ते याची भेट झाली होती, परंतु या भेटीचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून विरोधक त्याचेच भांडवल करीत आहेत. आपण कुठल्याची स्वरूपाची कसलीही माहिती सदावर्ते यांना पुरवली नाही असा खुलासा बारसकर यांनी केला आहे. गुणरत्न सदावर्ते सोबत असलेल्या फोटोबाबत देखील त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदावर्ते यांनी भेटलो होतो, मराठा समाज बैठकीत दाखविण्यात आलेला 'तो' फोटो २००३ मधील आहे असा खुलासाही बारसकर यांनी केला आहे. 




================


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !