BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जाने, २०२४

चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह संचालकांना जामीन !

 


शोध न्यूज : शिखर बँकेने दाखल केलेल्या फसवणूक गुन्ह्याप्रकरणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि अन्य संचालकांना अटकपूर्व अंतरिम जामीन मिळाला असल्याने या सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. 


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि  अन्य सर्व संचालकांच्या विरोधात राज्य शिखर बँकेने फसवणुकीची तक्रार पंढरपूर तालुका पोलिसांकडे केली  होती. त्यानुसार पोलिसांनी चेअरमन आणि सर्व संचालक यांच्या विरोधात फसवणूक तसेच अन्य कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.  यामुळे मोठी खळबळही उडाली होती आणि  पाटील समर्थकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देखील व्यक्त केली होती. दरम्यान अटक होण्याच्या भीतीने चेअरमन आणि सर्व संचालक यांनी पंढरपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्यांना दिलासा मिळाला आहे  या फसवणूकप्रकरणी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष प्रेमलता रोंगे व इतर १८ संचालकांना मंगळवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. बी. लंबे यांनी जमीन मंजूर केला.


राज्य सहकारी बँकेने विठ्ठल साखर कारखान्यास मागणीनुसार वेळोवेळी कर्ज दिलेले होते. मात्र बँकेने ठरवून दिलेल्या टॅगिंगप्रमाणे १८९ कोटींपेक्षा जास्त रक्कम न भरता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळांनी संगनमताने बँकेस आर्थिक नुकसान पोहोचविण्याचा आरोप ठेवत अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळावर झाला. (Bail to Abhijit Patil and other directors) याप्रकरणी फसवणूक व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशा आशयाची लेखी तक्रार बँकेचे प्रादेशिक अधिकारी कैलास घनवट यांनी दिली होती. या तक्रारीनंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.  त्यानंतर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता यावर   अभिजित पाटील यांना ७२ तासांसाठी अंतरिम अटकपूर्व जमीन मिळाला आहे. मात्र, इतर संचालकांवर अटकेची टांगती तलवार होती. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे, .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !