BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ डिसें, २०२३

शाळकरी मुलगा पतंगामागे धावला आणि -----

 

✪ ✪ ✪➤पंढरपूर लगत असलेल्या लक्ष्मी टाकळी उपनगरातील उघडी गटारे दहा दिवसांपासून तुंबलेलीच .... दुर्गंधी वाढली, डासांचे मोहोळ उठले पण ना कुणाला खेद, ना खंत ! .✪

शोध न्यूज : तरूणामध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली असुन्म पतंगाच्या मागे धावणाऱ्या शाळकरी  मुलाला हृदय विकाराचा झटका आला आणि दुर्दैवाने त्यात त्याचा मृत्यू देखील झाला आहे.


मागील काही वर्षापासून हृदविकार मोठ्या प्रमाणत वाढलेला असून, तरुण वयात देखील हृदयविकाराचा त्रास होताना दिसत आहे. तरुण तसेच अल्पवयीन वयात देखील हृदयरोग घुसला असून, अनेक तरुणांना व्यायाम करतानाही हृदय विकाराचा झटका आला आहे आणि त्यात त्यांचा मृत्यूही झाला आहे. हृदय विकार ही भारतातील वाढती समस्या बनली असून त्याला जीवनशैली देखील करा.कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. आता मात्र ही चिंता वाढवणारी घटना समोर आली असून, सातवीतील  शाळकरी मुलाचा हृद्य विकाराने मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव सोनेवाडी येथे ही चिंता वाढवणारी घटना घडली आहे.पतंगाच्या पाठीमागे धावताना एका विद्यार्थ्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबाला तर मोठा धक्का बसला आहेच पण सर्वांचीच चिंता देखील वाढवली आहे. 


सोनेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवी इयत्तेत शिकत असलेला,  साहिल गांगुर्डे या मुलाचा धक्कादायक मृत्यू झाला.  साहिल भाऊसाहेब गांगुर्डे या मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत आला होता, दिवसभर शाळेत अभ्यास तसेच खेळ यात तो रमला होता. सायंकाळी शाळा सुटल्यावर तो आपल्या घरी गेला होता. गावातील आठवडा बाजजार असल्यामुळे साहिलच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी मिठाई आणून ठेवली होती. पण ही मिठाई अशा प्रकारे कडू होईल याचा कोणालाच अंदाज नव्हता. साहिलने घरी आल्यावर दोन घास मिठाई खाल्ली आणि त्याचे लक्ष पतंग उडवीत असलेल्या  मुलांकडे गेले. मांजा तुटलेला एक पतंग अनियंत्रितपणे हवेत उडू लागला होता. काही मुले त्या पतंगाच्या मागे धावत होती. साहिल देखील त्यांच्या मागे धावत सुटला. त्याने पतंग पकडला  देखील परंतु धावण्यामुळे त्याला जोराची धाप लागली होती.


धावण्यामुळे साहिलची अवस्था काहीशी वेगळी झाली असल्याचे त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आले आणि त्यांनी साहिलला तातडीने रुग्णालयात नेले. दरम्यान त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी साहिलला कोपरगाव येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. दरम्यान वेगाने धावल्यामुळे आणि धाप लागत श्वास बंद झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. (School boy dies while chasing kite)सहकारी मित्रासमवेत दिवसभर शाळेत बागडून, आनंदाने साहिल घरी आला होता. आई वडिलांनी त्याच्यासाठी आणलेली मिठाई देखील त्याने खाल्ली आणि त्यानंतर काही क्षणात हे सगळे घडून गेले होते. या घटनेने परिसरात अस्वस्थता पसरली असून, गाव सुन्न झाले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !