BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ नोव्हें, २०२३

शरद पवार कुणबी की मराठा ? अखेर सत्य आले समोर !

 


शोध न्यूज :राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची जात नक्की कोणती ? कुणबी की मराठा ? याबाबत बरीच चर्चा होत होती पण आता त्यांच्या शालेचाच दाखला समोर आला असून त्यांची जात कुठली ? हा प्रश्न  आता कुणाला पडणार नाही.



राज्यात मराठा आरक्षण आंदोलन गाजू लागल्यानंतर अनेक नेत्यांनी आधीच  कुणबी प्रमाणपत्र घेवून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. यात काही प्रमाणात तथ्य आणि सत्यही आहे पण सरसकट मराठा नेते या आरोपांचा सामना करीत आहेत. शरद पवार यांच्या नावाचे एक खोटे प्रमाणपत्र व्हायरल झाले होते आणि पवारांना  जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा राजकीय डाव होता असे आता समोर आले आहे. हा सगळा प्रकार नागपूर येथून  झालेला असून, कायदा, सुव्यवस्था सांभाळण्याची ज्यांची  जबाबदारी आहे, तेच असा खोडसाळपणा करीत असल्याचा  आरोप देखील आता होऊ लागला  आहे. खरा दाखला समोर  आल्यामुळे कारस्थान रचणाऱ्याचे बिंग आपोआप फुटले आहे . 


मराठा आरक्षण आंदोलनात सरकार पेचात आणि भाजप गोत्यात येताना दिसत असतानाच, शरद पवार यांच्याव टाकला गेलेला डाव पुराव्यासह उधळण्यात आला आहे.  शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतले असल्याचे खोटे प्रमाणपत्र व्हायरल होत असून. हे प्रमाणपत्र खोटे आहे असा दावा करीत राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी खरे प्रमाणपत्रच समोर आणले आहे. (Sharad Pawar's caste is Kunbi or Maratha)  पासलकर यांनी, शरद पवारांचा शाळा सोडल्याचा दाखलाच  समोर आणला असून, या दाखल्यावर सुस्पष्टपणे मराठा असा उल्लेख दिसून  येत आहे. पवारांनी ओबीसीतील कुणबी  प्रमाणपत्र घेतलेले नाही   पण नागपूरहून हा खेळ होत आहे असा आरोपही पासलकर यांनी केला  आहे. त्यांचा रोख कुणाकडे आहे हे देखील लक्षात येवू लागले आहे.


शरद पवार यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले नाही  तरीही एवढ्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी काही लोक  विटॅमिन पुरवत असावेत. त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा अशीच नोंद आहे.   शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील यावर भाष्य केले आहे. हा केवळ  आणि केवळ बालीशपणा असल्याचे त्यांनी म्हटले  आहे . जे प्रमाणपत्र  व्हायरल होत आहे ते इंग्रजी आहे त्यामुळे होत असलेला खोडसाळपणा आपोआप उघडा पडला आहे असे सुळे यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी  मात्र ' ती परम्परा राष्ट्रवादीची  आहे, आमची नाही' असे सांगत हात झटकले आहेत. तरीही अशा  गोष्टी कोण करू शकते याची आता सामान्य नागरिकांनाही कल्पना  आलेली आहे.   

.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !