BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ नोव्हें, २०२३

झिरो पोलीसासह हवालदाराला तुरुंगाची हवा !

 


शोध न्यूज : फुकटच्या पैशाच्या मोहात पोलीस हवालदार आणि एका झिरो पोलिसाला चांगलाच फटका बसला असून दहा हजार रुपयांची  लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेने पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.


शासनाच्या विविध  विभागात भ्रष्ट्राचाराची गंगा अखंड वाहात असते , यात महसूल, पोलीस, महावितरण अशा विभागातील लाच खोरीच्या घटना नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा सोलापूर येथील एक पोलीस हवालदार आणि झिरो पोलीस हे दोघेही गोत्यात आले आहेत.सोलापूर आयुक्तालयाच्या अधीन असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस हवालदार प्रमोद कांबळे आणि झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे या दोघांवर लाचखोरी प्रकरणी कारवाई झाली आहे. सातत्याने लाचखोर अडकत असतानाही लाचखोरी काही  केल्या कमी होत नाही, उलट वाढलेलीच दिसत आहे. दोन गटातील तक्रारीत एका गटाला सहकार्य करण्यासाठी घडलेले हे लाच प्रकरण आता चर्चेचे ठरले आहे. एका गटाला सहकार्य करण्यासाठी हवालदार प्रमोद कांबळे याने लाच मागितली होती, नंतर त्याने ती घेतलीही आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आपल्या पद्धतीने सापळा लावून दोघानाही जेरबंद केले आहे.


दोन गटात झालेल्या तक्रार प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हवालदार प्रमोद कांबळे याच्याकडे तपास होता. सोलापूरच्या नई जिंदगी पोलीस चौकीतील या हवालदार कांबळे याने, एका गटाला सहकार्य करण्याचे आश्वासन देत वीस हजार रुपयांची लाच मागितली. यात तडजोड होत लाचेची रक्कम दहा हजार ठरली. ही लाच देणे मान्य नसल्यामुळे तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि या बाबत तक्रार दिली. या विभागाने सदर तक्रारीची पडताळणी केली आणि सापळा लावला. (Police arrested in bribery case)  हवालदार प्रमोद कांबळे याच्या वतीने दहा हजाराची लाच स्वीकारताना झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे या रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर गुन्हा दाखल करीत हवालदार कांबळे यालाही अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस दलात या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !