शोध न्यूज : मृत्यु होताच पुनर्जन्म झाल्याची एक धक्कादायक कहाणी सांगून एका आठ वर्षांच्या मुलाने सांगितलेली कहाणी ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. या मुलाने आपल्या पुनर्जन्माचा दावा केला आहे त्यामुळे परिसरात याची चर्चा सुरु झाली आहे.
विज्ञान युगात देखील अनेक अविश्वसनीय कथा समोर येत असतात, कुणी त्यावर विश्वास ठेवते तर कुणी खोटेपणाचा शिक्का मारत असते. अनेकदा चित्रपटात असतात तशा आणि मनाला न पटणाऱ्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडल्याचे सांगितले जाते, तेंव्हा त्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. माणसाचा मृत्यू झाल्यावर पुढे काय होते ? याबाबतचे गूढ आपल्याला कळावे अशी इच्छा असणारे देखील अनेकजण असतात. जवळपास सगळ्यांनीच पुनर्जन्माच्या कथा ऐकलेल्या असतात पण अशा कथाना कुणी भाकड म्हणते तर कुणी दुजोराही देत असते. पुनर्जन्म आहे असे ठामपणे सांगणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. काही असो, अशीच एक पुनर्जन्माची एक घटना समोर आली आहे आणि भल्याभल्यांची मती गुंग झाली आहे. एखादा लहान मुलगा आपल्या पूर्व आयुष्याबद्धल सांगतो, आणि ते सत्य असल्याची प्रचीती येते, अशावेळी कुणालाही आश्चर्य वाटणार आहे. एका आठ वर्षांच्या मुलांनी असाच सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
आठ वर्षांपूर्वी सर्प दंशामुळे मृत्यू पावलेल्या मनोज याचा आपल्याच मुलीच्या पोटी जन्म झाल्याचा दावा, उत्तर प्रदेशातील मैनपुरी जागीरच्या रतनपूर गावात करण्यात आला आहे. हा मुलगा आपल्या आजीला आपली बायको म्हणत आहे तर आपल्या आईला मुलगी म्हणत आहे. त्यामुळे लोकांना देखील याचे मोठे कुतूहल वाटू लागले आहे. त्याचा हा व्हिडीओ देखील सगळीकडे व्हायरल होत आहे आणि लोक देखील मोठ्या कुतूहलाने हा व्हिडीओ पहात आहेत. पुनर्जन्म हा वादाचा विषय आहे, त्यात किती खरेपणा आणि किती खोटेपणा याचे ठोस उत्त्तर कुणाकडेच नाही, शिवाय ही एक अंधश्रद्धा आहे असे देखील मानले जात आहे. असे असले तरी अशा घटना घडल्या की चर्चा मात्र होत असतेच आणि आता पुन्हा अशी चर्चा सुरु झाली आहे.
मनोज मिश्रा नावाच्या शेतकऱ्याचा ९ जानेवारी २०१५ साली मृत्यू झाला होता. आपल्या शेतात काम करीत असताना त्याला विषारी नागाने दंश केला आणि यात त्याचा मृत्यू झाला. ही बाब गेल्या काही वर्षातील असल्याने या घटनेतील सत्य समोर येण्यास अधिक वेळ लागला नाही. मनोज मिश्रा यांना सर्पदंश झाल्यानंतर आधी त्याची दृष्टी गेली आणि नंतर मृत्यूही झाला. पण यावेळी या मनोजची मुलगी रंजना ही गर्भवती होती. मनोजच्या मृत्युनंतर तेरा दिवसांच्या आत, त्याची मुलगी रंजना हिने एक बाळाला जन्म दिला होता. या बाळाचे नाव आर्यन ठेवण्यात आले. आर्यन मोठा होत होता, त्याची आई त्याला काळजीने वाढवत होती. एके दिवशी हा आर्यन आपल्या आईसोबत मैनपुरी येथे आला आणि त्याने आपल्या पुनर्जन्माची कहाणी सांगायला सुरुवात केली . त्याच्याकडून ही कहाणी ऐकून त्याचे कुटुंब आश्चर्यचकित झाले आहे.
आपला मृत्यू कसा झाला होता त्याची कहाणी तो आपल्याच तोंडून सांगत होता. त्यावेळी घडलेल्या बारीकसारीक घटना देखील तो सांगत होता. शेतात काम करताना सर्पदंश होऊन सुरुवातीला आपण बेशुद्ध झालो होतो हे देखील त्याने सांगितले. आपली आजी ही आपल्या आधीच्या जन्माची पत्नी आहे आणि आपली आई ही आपली मागच्या जन्माची मुलगी आहे असे देखील तो सांगत आहे . आठ वर्षाचा मुलगा सांगत असलेली ही कहाणी ऐकून सगळे थक्क होत आहेत. गावातील आणि परिसरातील लोक देखील कुतूहलाने त्याच्याकडे येत आहेत. ( A story of rebirth told by an eight-year-old boy) त्याच्या पुनर्जन्माची कथा ऐकून अनेकजण तोंडात बोट घालत असले तरी, त्याने जेंव्हा बँकेतील पैशाबाबत माहिती दिली तेंव्हा मात्र अनेकजणांची बोलती बंद झाली. अन्य नात्यातील लोकांच्या बाबत देखील तो माहिती देत आहे आणि लोक केवळ आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !