BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मे, २०२३

पंढरपूर येथून परत जाताना अपघात, तीन ठार, सात भाविक जखमी !

 



शोध न्यूज : पंढरीच्या विठू माउलीच्या दर्शनावरून परत आपल्या गावी येत असताना भाविकांवर काळाने मोठा घाला घातला आणि घर केवळ दोन किमी अंतरावर राहिलेले असतानाच तीन भाविकांना आपला प्राण गमवावा लागला, अन्य सात जण गंभीर जखमी झालेले आहेत.


अपघाताचे प्रमाण वाढलेले असले तरी देव दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचे अपघात देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. गेल्या दोन वर्षात पंढरपूरला जाताना किंवा दर्शन करून परत येताना झालेल्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. आता पुन्हा आज एक असाच भीषण आणि भयंकर अपघात झाला असून यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सात भाविक गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. वाहनचालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातून काही भाविक खाजगी गाडीने पंढरपूर येथे पोहोचले होये, विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेवून ते रात्रीच्या वेळीच परतीच्या प्रवासाला लागले होते.  काल २१ मे रोजी  रात्रीपासून भाविकांचा हा प्रवास सुरु होता. सदर भाविक आपल्या गावाजवळ पोहोचलेही होते, केवळ दोन किमी अंतरावर घर आले असतानाच त्यांच्यावर हे संकट कोसळले आहे.  भाविक अगदी त्यांच्या घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.

पंढरीतून  देवदर्शन करून घराकडे परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. शेगाव येथे  देशमुख पेट्रोल पंपाजवळ भाविकांचे हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पिलरवर धडकले. चालकाच्या अनावर झोपेमुळे गावाजवळ पोहोचल्यावर ही दुर्घटना घडली.  या अपघातात 3 भाविकांचा जागीच मृत्यू तर ७ गंभीर भाविक जखमी झाले आहेत. (Accidental death of three devotees returning from Pandharpur) यातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोल्यात हलविण्यात आले.

विठूमाउलीच्या  दर्शनासाठी शेगाव येथून काही भाविक  खाजगी गाडीने पंढरपूर येथे गेले होते. पंढरपूर येथे दर्शन घेवून ते परतीच्या प्रवासाला लागले होते परंतु घराच्या जवळ पोहोचल्यावर काळाने घाला घातला.  घर जवळ आले असताना भाविकांच्या वाहनाला शेगावात मोठा अपघात झाला.  शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी ही क्रुझर गाडी, शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. वेगात असलेली गाडी उभ्या पिलरवर आदळल्याने तीन भाविकांना जागीच मृत्यू आला, याच गाडीतील अन्य सात भाविक देखील अत्यंत गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. जखमींना नागरिकांच्या मदतीने शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या भाविकांना पुढील उपचारार्थ अकोल्यात हलवण्यात आले आहे. 

हा अपघात केवळ चालकाच्या झोपेमुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे, पंढरपूर येथे पोहोचणे आणि दर्शन करून लगेच परतीच्या प्रवासाला लागणे, यात चालकाला विश्रांती मिळाली  नाही की झोप देखील मिळालेली नव्हती, त्यामुळे परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर चालक थकलेला होता, त्याला झोप अनावर झाली होती परंतु गाव जवळ आले असल्याने भाविकांनी थांबणे अथवा विश्रांती घेणे टाळले. भाविकांच्या घरापासून ही गाडी अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर होती आणि तेवढ्यात ही दुर्घटना घडली. घरी पोहोचण्याच्या वेळीच या अपघातात तीन भाविकांना आपले प्राण गमवावे लागले.  थोडीशी बेपर्वाई तीन भाविकांचा प्राण घेवून गेली असून, देव दर्शनासाठी प्रवास करणाऱ्या भाविकांनी अशा घटनातून तरी बोध घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !