BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ मार्च, २०२३

गद्दारीचा जाब विचारात शिंदे गटातील खासदारांची गाडी अडवली !



शोध न्यूज : उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी का केली ? असा जाब विचारत शिवसैनिकांनी (ठाकरे) शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या गाड्यांचा ताफा रोखला यामुळे अचानक मोठा गोंधळ उडाला.


शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार यांनी भाजपशी संगनमत करून राज्यात सत्तांतर घडवले पण यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ सैनिक प्रचंड दुखावले आहेतच पण राज्यातील सामान्य जनतेला देखील हे न पटल्यामुळे उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती राज्यात मिळू लागली असल्याचे रोज दिसत आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ जनतेला मनापासून आवडला असल्याच्या अनेक पावत्या मिळत असतात. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवाला अशा प्रकारे धोका दिला गेल्याने सर्वसामान्य जनतेत देखील चर्चा सुरु आहे. चाळीस आमदारांना ठाकरे गटाकडून गद्दार म्हणून संबोधले जात असले तरी सामान्य माणसांची भावनाही काही वेगळी नाही हेच दिसत असताना नुकतेच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना एका वृद्ध नागरिकाने तोंडावर गद्दार म्हणून संबोधले आहे तसेच  गद्दारी का केली ? असा जाब देखील विचारला आहे. राज्यातील हे वातावरण उद्धव ठाकरे गटाला अधिक मजबूत बनवत असल्याचे पुन्हा पुन्हा दिसून येत असताना शिवसैनिक तर प्रचंड संतापलेले आहेत. आज त्याचे पडसाद पुन्हा उमटले आहेत. 


शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेल्या हातकणंगले मतदार संघातील खासदार धैर्यशील माने यांच्या गाड्यांचा ताफा आज ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अडवला आणि गद्दारी बाबत जाब विचारला गेला. शिवसैनिकांच्या भावना अत्यंत संतप्त असून त्यांनी ताफा रोखून उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी का केली ? असा थेट सवाल विचारला. या घटनेत ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि यामुळे वातावरण चांगलेच तापले गेले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी  तातडीने हस्तक्षेप केला तेंव्हा कुठे खासदार धैर्यशील माने यांची गाडी पुढे जाऊ शकली. खासदार संजय राऊत यांचा कोल्हापूर दौरा नुकताच झाला आहे आणि यावेळी त्यांनी इचलकरंजी येथे घेतलेल्या सभेत खासदार माने यांच्यावर सडकून टीका केली होती. शिवसैनिक देखील आक्रमक दिसत होते. (The car of MPs from Shinde group was stopped in consideration of betrayal)  शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवताना त्यांच्या विजयासाठी झटलेल्या शिवसैनिकांशी तसेच त्यांना तिकीट देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्यामुळे शिवसैनिक संतप्त आणि आक्रमक आहेत असे ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांनी म्हटले आहे. प्रत्येक गावात अशाच प्रकारे अडवून जाब विचारला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !