शोध न्यूज : माजी मंत्री आमदार आणि प्रहार चे बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी कडू यांना दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
शासकीय अधिकारी यांना दमदाटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून बच्चू कडू यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. या आधीही कडू यांना न्यायालयाकडून शिक्षा सुनावली गेली होती. यापूर्वी म्हणजे २०१४ साली शिक्षण राज्यमंत्री असताना बच्चू कडू यांना एका प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यांना चांदूरबाजार न्यायालयाने दोन महिन्यांचा साधा कारावास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला होता. त्यानंतर आज पुन्हा त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. (Former Minister, MLA Bachu Kadu sentenced to two years) शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. नाशिक महापालिका आयुक्त यांच्यावर हात उगारण्यात आला होता आणि मारहाण करण्यात आली होती असा आरोप कडू यांच्यावर करण्यात आला होता.
नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांना दिव्यांग कल्याण निधीच्या खर्चावरून बच्चू कडू यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ केली. दिव्यांग कल्याण निधी का खर्च केला नाही असा जाब विचारात वादाला सुरुवात झाली होती. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करीत पुढील वाद रोखला होता आणि याप्रकरणी बच्चू कडू यांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि न्यायालयात बच्चू कडू यांच्याविरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. सदर प्रकरणाची सुनावणी होऊन न्यायालयाने कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यामुळे कडू यांच्यापुढील अडचणी वाढू लागल्या असल्याचे दिसत आहे. कडू यांना दोन प्रकरणात एकूण तीन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे परंतु त्या एकाच वेळी भोगायच्या असल्याने दोन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. महापालिका आयुक्त यांना धमाकवणे आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होता.
दिव्यान्गांच्या मागण्यासंदर्भात सुरु असलेल्या या आंदोलनाला वेगळे वळण लागले होते. यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा (भारतीय दंड विधान कलम ३५३) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्धल एक वर्षे तर सरकारी अधिकारी यांना अपमानित केल्याबद्धल दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली. या दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. बच्चू कडू यांना ही शिक्षा झाल्याने त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ झालेले असून कडू हे या शिक्षेविरोधात अपील करणार असल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांना वरच्या कोर्टात अपिल करेपर्यंत जामीनही मंजूर करण्यात आल्याने बच्चू कडू यांनी दिलासा मिळाला आहे. तीन तीन वर्षे पालिकेच्या आयुक्तांनी दिव्यांग निधी खर्च केला नाही त्यामुळे आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली. आयुक्तांना दोन वेळा पत्र लिहिली पण त्यांनी या पत्रांना उत्तरही दिले नाही त्यामुळे कंटाळून आम्ही येथे आलो होतो. हे आंदोलन काही मौजमजा म्हणून केलेले नव्हते असे बच्चू कडू यांनी शिक्षा सुनावल्यावर बोलताना सांगितले.
आमदार बच्चू कडू यांना २०१७ मधील या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली असली तरी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वरील न्यायालयात अपील करेपर्यंत हा जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांना पंधरा हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन देत त्यांची सुटका करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !