BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मार्च, २०२३

रस्त्याकडेला थांबलेल्या वृद्ध शेतकऱ्याला टँकरने चिरडले !


 शोध न्यूज : मळीची वाहतूक करणाऱ्या एका टँकरने वृद्ध शेतकऱ्याला चिरडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून संतप्त नागरिकांनी पळून जात असलेल्या टँकरवर (Accident)  दगडफेक केली आणि काचा फोडल्या आहेत. 


उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील ६७ वर्षे वयाचे शेतकरी आनंदा विश्वनाथ गरड हे रस्त्याच्या कडेला उभे असतानाही मळीची वाहतूक करणाऱ्या एका टँकरने त्यांना जोराची धडक दिली आणि नंतर या टँकरने या  वृद्ध शेतकऱ्याला चिरडले. याबाबत शुभम गरड यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील टँकरचालक अंकुश अर्जुन सेनमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाती मृत्यू झालेले आनंदा गरड हे रानमसले - बीबी दारफळ रस्त्यावर रस्त्याच्या कडेला उभे होते. रस्त्याच्या बाजूला थांबलेले असतानाही टँकर चालक सेनमारे या अविचाराने आणि हायगयीने टँकर चालवत त्यांना जोराची धडक मारली आणि टँकरच्या खाली चिरडले. या घटनेत गरड हे जबर जखमी झाले. त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. 


अपघात झाल्यानंतर टँकर चालक अंकुश अर्जुन सेनमारे हा घटनास्थळी न थांबता किंवा जखमीला मदत न करता तसाच पुढे निघून जात होता परंतु जवळच्या नागरिकांनी आरडाओरडा केला. त्याला थांबण्याचा इशारा केला पण तो थांबण्याच्या मनस्थितीत दिसत नाही हे पाहून संतप्त जमावाने टँकरवर दगड मारायला सुरुवात केली. अपघाताच्या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने टँकरच्या काचा तसेच लाईट फोडून टाकल्या आहेत.  (The old farmer was crushed by a tanker on the road!) सदर घटनेची नोंद सिव्हिल चौकीत करण्यात आली आणि नंतर टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !