शोध न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेस सहकार विभागाचे उपाध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी असलेल्या राजेंद्र हजारे यांच्यासह तिघांच्या विरोधात सोलापुरात फसवणूक आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रामपूर खेडपाडा येथील अमृत केशव पडवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा सोलापूर सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार विभागाचे उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी तसेच जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे प्रमुख राजेंद्र हजारे यांच्यासह तिघांविरुध्द हा गुन्हा दाखल झाला असून यामुळे राजकीय वर्तुळात हलचल माजली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आदिवासी व्यक्तींच्या जमिनी खरेदी करण्यासाठी काही नियम आणि कायदे आहेत. अशा जमीनी खरेदी करणारा व्यक्ती आदिवासीच असावा लागतो. त्यांच्या शिवाय अन्य व्यक्तींना आदिवासी व्यक्तीच्या नावावरील जमीन लीलावाशिवाय खरेदी करता येत नाही. हे माहित असतानाही राजेंद्र हजारे, अमर जाधव आणि यशवंत पाटील यांनी अशा जमिनी लिलावाच्या माध्यमातून कमी पैशात खरेदी करण्यासाठी कट रचला असा आरोप करण्यात आला आहे.
अमृत पडवळे हे आदिवासी समाजाचे (मागासवर्गीय) असून त्यांना सुरुवातीला नोकरी लावतो, मासिक २५ हजार रुपये देतो तसेच कंपनीचा डायरेक्टर देखील करतो असे आमिष दाखवले आणि कर्जत, डहाणू तसेच चिंचलखैरे येथल आदिवासी व्यक्तींच्या जमिनी अमृत पडवळे यांच्या नावावर आदिवासी व्यक्तींच्या जमीनी कमी पैशात खरेदी केल्या. लिलावाच्या माध्यमातून या जमिनी कमी पैशात खरेदी करता याव्यात म्हणून आदिवासी जमिनीवर अमृत पडवळे यांच्या नावे नियमबाह्य व चुकीच्या नोंदी करण्यात आल्या. त्यासाठी सोलापूर येथील जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीकडून एक कोटी दहा लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले. बनावट विड्रॉल स्लिप व बनावट रक्कम हस्तांतरण पत्राच्या आधारे सदर कर्जाची रक्कम बँक खात्यात परस्पर जमा करण्यात आली. कर्जत येथील आदिवासी जमीन लिलावाच्या माध्यमातून विकत घेण्याच्या हेतून सदरचे कर्जाचे प्रकरण एनपीए केले गेले आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी पनवेल दिवाणी न्यायालयाची नोटीस पडवळे यांना पाठविण्यात आली. प्रत्यक्षात पडवळे यांनी कर्ज घेतलेच नव्हते पण त्यांना एक कोटी दहा लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी दडपण आणण्यात आले आणि फसवणूक केली असे पडवळे यांचे म्हणणे आहे.
पडवळे यांच्या सदर फिर्यादीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार विभागाचे उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी तसेच जनकल्याण मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे प्रमुख राजेंद्र हजारे (सोलापूर) यांच्यासह अमर विजय जाधव ( नवी मुंबई), यशवंत वसंतराव पाटील ( कुर्ला, मुंबई) यांच्या विरोधात फसवणूक आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Cheating and atrocity case filed against three including NCP office-bearers)त्यामुळे सोलापुरात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच राजकीय क्षेत्रात हा चर्चेचा विषय बनला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !