BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जाने, २०२४

प्रभू श्रीरामाचे पाय धरताच त्यांनी सोडला प्राण, लोकांनी मात्र वाजवल्या टाळ्या !



शोध न्यूज : प्रभू श्रीरामाच्या पायाला स्पर्श करताच त्यांनी रामाच्या पायावरच आपला प्राण सोडला परंतु उपस्थितांनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट केला. काही वेळेतच सत्य परिस्थिती समजली तेंव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला.


रामायणात राम भक्त हनुमानाच्या श्रीराम भक्तीचे अनेक धडे देण्यात आलेले आहेत. हनुमान हे श्रीरामाचे निस्सीम भक्त होते. आपल्या प्रभूसाठी ते काहीही करायला तयार असायचे. इथे मात्र अशी एक  घटना घडली की, हनुमानाची भूमिका करणाऱ्या कलावंताने श्रीरामाची भूमिका करणाऱ्या कलावंताच्या पायावर आपला प्राण सोडला आहे.  रामलीला हा एक लोकप्रिय कला प्रकार आहे. रामलीलामधून रामायण सादर करण्यात येत असते. असाच रामलीला कार्यक्रम सुरु असताना, हनुमानाची भूमिका साकारत असलेल्या कलावंताने, रामलीला मधील रामाचे पाय धरले आणि त्याच क्षणी त्यांनी आपला प्राण सोडला. रामलीला पाहण्यात दंग असलेल्या प्रेक्षकांनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट केला. हनुमानाची भूमिका करणारा कलावंत देखणा अभिनय करीत आहे असेच प्रेक्षकांना वाटले आणि त्यांनी अभिनयाला दाद देत टाळ्या वाजवल्या.


हनुमानाची भूमिका करीत असलेले हरीश हे तसेच श्रीरामाच्या पायावर पडून राहिले. बराच वेळ ते तसेच पडून राहिल्यामुळे कार्यक्रम खोळंबून राहिला होता. हरीश उठत नाहीत हे पाहून मात्र नंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले आणि सर्वांनाच धक्का बसला. ६२ वर्षे वयाचे हरीश हे कार्यक्रम सुरु असतानाच मृत्युमुखी पडले होते. हरियाणामधील भिवानी जिल्ह्यात आयोजित रामलीला कार्यक्रमात ही मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. अयोध्येच्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त | राज्यभरात अनेक ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, त्यातच  रामलीला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद घेण्यासाठी हनुमानाने श्रीरामाचे पाय धरले आणि त्याच क्षणी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लोक मात्र अभिनय समजून टाळ्या वाजवत राहिले. नंतर खरा प्रकार समजला तेंव्हा सगळ्यांनाच धक्का बसला.


ह्नुमानाची भूमिका करणारे हरीश हे इंजिनिअर होते, उर्जा विभागातून ते कनिष्ठ अभियंता या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांना अभिनयाची आवड होती आणि ते गेल्या २५ वर्षांपासून रामलीला कार्यक्रमात हनुमानाची भूमिका करीत होते. (He left his life at the feet of Shri Rama) श्रीरामाच्या पायावर ते कोसळले त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने प्रेक्षक हळहळले तर त्यांच्या सोबतच्या कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !