शोध न्यूज : शेतीच्या कारणावरून होत असलेल्या वादातून पंढरपूर तालुक्यात एकाचा खून करून विहिरीत फेकून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले असून याप्रकरणी तिघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतीचे आणि बांधाचे वाद हे काही नवे नाहीत, शेतीच्या कुठल्या ना कुठल्या कारणांनी ग्रामीण भागात आपसात वाद होत असतात. काही वाद आपसात मिटतात तर काही न्यायालयाच्या दारात जात असतात परंतु यातील काही वादाचे रुपांतर अत्यंत टोकाला जाते आणि कुणीतरी कुणाचा जीव घेवूनच या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातो. काल जत तालुक्यात भावकीतील लोकांची जमिनीच्या वादातून दोघांचा खून केल्याची घटना घडली असताना पंढरपूर तालुक्यात देखील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेने करकंब परिसर हादरून गेला आहे. शेताच्या रस्त्याच्या कारणावरून आपसात सुरु असलेले भांडण वेगळ्याच वळवणार गेले आणि एका शेतकऱ्याच्या डोक्यात हत्याराने वार करून नंतर त्याला विहिरीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या घटनेने पंढरपूर तालुक्यातील करकंब परिसर हादरून गेला आणि याच घटनेची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
साठ वर्षे वयाचे शेतकरी वामन दशरथ जमदाडे या शेतकऱ्याच्या डोक्यात हत्याराने वार करून त्यांचा खून करण्यात आला आणि नंतर विहिरीत टाकून देण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. या घटनेबाबत मयत वामन जमदाडे यांचा मुलगा रमेश वामन जमदाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून फिर्यादीत त्यांनी आरोपींशी असलेले वैमनस्य स्पष्ट केले आहे. पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथील अनिल कुंडलिक माळी, दत्तात्रय कुंडलिक माळी, भारत कुंडलिक माळी यांच्याशी आधीपासूनच शेताच्या रस्त्यावरून वाद होता. गेल्या दहा वर्षांपासून हा वाद भिजत आणि धुमसत होता. हे भांडण न्यायालयात देखील पोहोचलेले होते. हा खटला सुरु असताना १० मार्च रोजी सुनावणीच्या वेळी आरोपी न्यायालयात उपस्थित झाले होते. यावेळी वामन जमदाडे याना भारत याने 'तुला बघून घेतो' अशी धमकी दिली होती आणि या धमकीबाबत वामन जमदाडे यांनी घरी आल्यावर सांगितले देखील होते. त्यानंतर वामन जमदाडे यांना डोक्यावर वार करून मारून टाकण्यात आले आणि नंतर एका विहिरीत फेकून देण्यात आले.
सदर प्रकरणी मयत वामन जमदाडे यांचा मुलगा रमेश याने करकंब पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनिल कुंडलिक माळी, दत्तात्रय ' कुंडलिक माळी, भारत कुंडलिक माळी अशी या आरोपींची नावे असून या घटनेने करकंब परिसरात खळबळ उडाली आहे. (Murder of an old farmer in Pandharpur taluka, agriculture road dispute) पोलिसांनी मात्र तातडीने पुढील कारवाई सुरु केली असून अधिक तास करकंब पोलीस करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !