BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ फेब्रु, २०२३

दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात, एक ठार तर सात जखमी !

 


शोध न्यूज :अक्कलकोट येथे स्वामी समर्थ दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. टेंपो आणि ट्रक यांच्यात हा अपघात (Accident) झाला आहे.  


मुंबई येथून काही भाविक टेंपोमधून प्रवास करीत अक्कलकोट स्वामी दर्शनासाठी निघाले होते. अक्कलकोट जवळ एका हॉटेलच्या समोरच्या बाजूला गतिरोधकावर झालेल्या या अपघातात टेंपोचालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सात भाविक गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. जखमी झालेले सर्व भाविक एकाच कुटुंबातील आहेत. ऊसाची वाहतूक करणारा ट्रक (केए- ५६, ०१७२) सोलापूरकडून अक्कलकोटकडे येत होता. गतिरोधकावर येताच ट्रकचा वेग अचानक कमी झाला आणि पाठीमागून येणारा भाविकांचा टेंपो या ट्रकला पाठीमागून धडकला. टेंपोने समोरच्या ट्रकला जोराची धडक दिल्याचे टेंपोचालक प्रकाश कचरू लोहटे याचा जागीच मृत्यू झाला. मुंबईच्या अंधेरी येथील एकाच कुटुंबातील नवनाथ ज्ञानेश्वर बागडे, मुलगी समृद्धी नवनाथ बागडे, संस्कृती नवनाथ बागडे, जय नवनाथ बागडे, कविता नवनाथ बागडे, तसेच अश्विनी सुनील भोबले, अस्मिता सुनील भोबले हे भाविक गंभीर जखमी झाले आहेत.


अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले शिवाय नागरिकांनीही येथे गर्दी केली . जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Truck and tempo accident, driver killed, devotee injured) अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करून चुंगी येथील ट्रक चालक दौलत गंगाराम कोळी याला पोलिसांनी अटक केली आहे. ट्रकचालक कोळी हा ऊस भरण्यासाठी अक्कलकोटच्या दिशेने निघालेला होता. 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !