BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ फेब्रु, २०२३

शेतकरी दांपत्याला ट्रॅक्टरने उडवले, पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

 



शोध न्यूज : पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जात असलेल्या दांपत्याच्या दुचाकीला ट्रॅक्टरने ठोकरल्याने दुचाकीवरील पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाल्याची घटना माधा तालुक्यात घडली आहे. 


रात्रीच्या वेळेस शेतीसाठी थ्री फेज लाईट असल्यामुळे माढा तालुक्यातील कव्हे एय्ठेईल शेतकरी पती पत्नी पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळेस दुचाकीवरून शेतात निघाले असताना ही दुर्घटना घडली. गणेश बाबुराव इंगळेश्वर हे आपली  पत्नी राणी गणेश इंगळेश्वर यांच्यासह दुचाकीवरून आपल्या शेतात निघाले होते. रात्रीच्या वेळेला वीज उपलब्ध असल्याने आणि पिकांना पाणी देणे गरजेचे असल्यामुळे ते रात्रीच शेताकडे इघाले असताना समोरून भरधाव वेगात एका अज्ञात ट्रॅक्टर आला आणि त्याने या पतीपत्नीच्या दुचाकीला जोराने धडक दिली. जोरदार धडकने दुचाकीवरील दोघेही अचानक संकटात आले आणि राणी गणेश इंगळेश्वर या ३९ वर्षाच्या महिला ट्रॅक्टरच्या टायरखाली आल्या त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश इंगळेश्वर हे गंभीर जखमी झाले.  शेतीसाठी दिवसा पुरेशी वीज द्यावी ही शेतकऱ्यांची जुनीच मागणी आहे परंतु शासनाला अजून घाम फुटलेला नसून रात्री पिकांना पाणी देण्याच्या प्रयत्नात शेतकऱ्याच्या बाबतीत अनेक धोकादायक घटना घडतच आहेत.  रात्रीच्या वेळी पिकात धोका असताना आता शेतात निघालेल्या शेतकरी दांपत्याला देखील हा मोठा फटका बसला आहे. 


ट्रॅक्टरची धडक बसताच राणी या थेट ट्रॅक्टरच्या टायरखाली गेल्या त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि गणेश हे बाजूला फेकले गेले परंतु त्यांना पायाला, विशेषत: डोक्याला जबर मार लागला असल्याने ते देखील गंभीर स्वरुपात जखमी झालेले आहेत. त्यांना बार्शी येथील एका खाजगी रुगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. (Tractor two-wheeler accident, farmer's wife dies, husband seriously injured) पोलिसांनी गणेश यांची फिर्याद घेत अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आता या ट्रॅक्टरचा आणि चालकाचा शोध घेत आहेत. मोठा अपघात करून ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरसह तेथून पळून गेला आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !