शोध न्यूज : नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने बलात्कार केल्याने सातवीत शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती झाली असल्याची अत्यंत धक्कादायक बाब उघडकीस आली असून समाजासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
महिला आणि अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना रोज आपल्या आजूबाजूला घडत असतात. अशा प्रकारात वरचेवर वाढच होत असून एकेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याने महिला, मुलींची सुरक्षितता मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली दिसत असते. आता तर त्यापेक्षाही वेगळी आणि तितकीच धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली असून ही परिस्थिती भविष्यात कुठल्या स्तराला जाणार आहे ? असा चिंताजनक सवाल देखील यामुळे उपस्थित होऊ लागला आहे. अल्लडपणे खेळण्याचे वय असलेली सातवीत शिकणारी मुलगी चार वर्षाची गरोदर असल्याची बाब अचानक उघडकीस आली आणि तिच्या पालकांसह समाजमनालाही मोठा धक्का देवून गेली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीला तिच्या पालकाने विश्वासात घेवून विचारले असता नववीत शिकणाऱ्या एका मुलाने गोड बोलत तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला होता अशी माहिती या मुलीने सांगितली आहे.
नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने सप्टेंबर २०२२ या महिन्यात बलात्काराची घटना घडली असून आता ती चार महिन्याची गर्भवती आहे. एवढी घटना घडूनही या मुलीने देखील याबाबत पालकांना काहीही कळू दिले नव्हते. जेंव्हा या मुलीची मासिक पाळी नियमितपणे न आल्यामुळे तिच्या पालकांनी डॉक्टरांकडे तिला नेले आणि तिची तपासणी केली तेंव्हा प्रारंभी डॉक्टर हादरले. सदर मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे तपासणीत उघड झाले. पिडीत मुलीच्या कुटुंबाला तर हे ऐकून जबर धक्का बसला. विश्वास न बसण्यासारखी घटना सत्यात पाहून कुटुंबाच्या पायाखालची जमीन दुभंगली. अखेर पालकांनी तिला विश्वासात घेतले तेंव्हा तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. सदर मुलगा हा दुसऱ्या शाळेत शिकत आहे परंतु इन्स्टाग्रामवर या दोघांची मैत्री जमली होती आणि त्यातून पुढे हा धक्कादायक प्रकार घडला. चार महिन्यांनी तो वैद्यकीय तपासणीत उघडकीस आला.
सदर प्रकार उघडकीस आल्यावर पिडीत मुलीच्या आईने लगेच शाहूपुरी पोलीस स्टेशन गाठले आणि त्या मुलाच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला रिमांड होममध्ये पाठवले गेले या घटनेने अनेकांना हादरा बसला असून मुलींच्या पालकांसाठी हा मोठा धक्का ठरला आहे. नागपूर येथे देखील नुकतेच एक १२ वर्षे वयाची मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याची बाब प्रकाशात आली होती. (It is revealed that a minor girl is pregnant due to rape, the accused is a minor) मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांच्या तपासणीत ती चार महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले होते. अशा घटना पुन्हा पुन्हा घडू लागल्या असून ही एक मोठी चिंतेची बाब बनून गेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !