शोध न्यूज : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत भीषण असा अपघात होऊन माय लेकरांसह तिघांचा मृत्यू झाला असून भरधाव वेगातील कार तीन वेळा पलटी झाली आहे.
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलेले असल्याचे चिंता व्यक्त केली जात असतानाच आता पुन्हा एका अपघाताची घटना घडली असून हा अपघात अत्यंत भीषण असा आहे. भरधाव वेगात निघालेल्या स्विफ्ट कारने सलग तीन वेळा पलटी मारली आणि यात माय लेकरांसह आणखी एकचा असा तिघांचा जागीच मृत्यू होण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने स्विफ्ट कार वेगाने निघाली असताना भिगवण बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या उतारावर आलेली असताना चालकाने कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. या कारमधून प्रवास करणारे ३५ वर्षीय संदीप राजाभाऊ माळी आणि त्यांची आई सरस्वती राजाभाऊ माळी तसेच बालाजी केरबा तिडके या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ५४ वर्षे वयाचे चंद्रकांत रामकिशन गवळी हे मात्र या अपघातून बचावले असले तरी ते जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेही लातूर जिल्ह्यातील आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हा अपघात पाहते पावणे चार वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात आले आहे. एका जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्यात आई आणि मुलाचा समावेश असून या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. (Three killed in horrific accident on Solapur-Pune highway) पुण्याकडे निघालेल्या कार चालकाला पहाटेच्या वेळी झोप लागली असावी आणि त्यामुळेच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले असावे अशी प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे. जावयाच्या गृह प्रवेश कार्यक्रमासाठी लातूर येथून स्वीफ्ट मोटार कारने माळी कुटुंब पुण्याकडे निघाले होते. सोलापुर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर इंदापुर तालुक्यातील डाळज क्र. १ गावाच्या हद्दीत अपघाताची ही घटना घडली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !