शोध न्यूज : पंढरपूर -दिघंची मार्गावर झालेल्या अपघातात पंढरपूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला असून टेंपो आणि दुचाकीच्या या अपघातात तिघे जखमी झाले आहेत.
पंढरपूर ते दिघंची दरम्यानच्या रस्त्यावर सांगोला तालुक्यातील चिकमहूद गावाजवळ टेंपो आणि दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. गुरुवारी सायंकाळी बंडगरवाडी पाटीच्या जवळ हा अपघात झाला असून यात पंढरपूर तालुक्यातील एका वृद्ध व्यक्तीसह दोघांचा मृत्यू झाला आहे, अन्य तिघे जखमी झालेले आहेत. पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील उमेश बाळू लोखंडे, गार्डी येथील दत्तू हरिबा आडगळे (वय ७५) तसेच माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील संजय गजेंद्र खंडागळे हे तिघेजण दिघंचीकडून पंढरपूर रस्त्याने गार्डीकडे दुचाकीवरून निघालेले होते. विनाक्रमांकाची दुचाकी घेवून ते निघाले असताना बंडगरवाडी पाटी येथे ते पोहोचले असताना समोरून आलेल्या टेंपोशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. सांगोला तालुक्यातील कटफळ येथील टेम्पो चालक समाधान दिलीप कोकरे आणि साजन रमेश शेळके ( रा. पळसावडे, ता. माण, हल्ली कटफळ, ता. सांगोला) हे मामा भाचे छोटा टेम्पो (एमएच १० एक्यू ०८०९) घेवून कटफळ गावाकडे निघाले होते. समोरासमोर झालेल्या या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.
या अपघातात पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील ७५ वर्षे वयाचे दत्तू हरिबा आडगळे आणि पळशी येथील उमेश बाळू लोखंडे हे जागीच ठार झाले (Tempo - two-wheeler accident, death of two in Pandharpur taluka) तर खंडाळी येथील संजय गजेंद्र खंडागळे याच्यासह टेंपोचालक समाधान दिलीप कोकरे, साजन रमेश शेळके हे तिघे जखमी झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !