BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ फेब्रु, २०२३

शिवसेनेच्या माजी मंत्र्यांवर शासकीय विश्रामगृहात बलात्काराचा गुन्हा !

 


शोध न्यूज : शिवसेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी शासकीय विश्रामगृहात बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने पोलीस ठाण्यात केली असून खंदारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचे एक प्रकरण राज्यभर गाजले असून अजूनही हे प्रकरण धुमसत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील आणखी एका राजकीय व्यक्तीबाबत महिला आक्रमक होत समोर आली आहे. भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात दाखल झालेला एक गुन्हा अजूनही चर्चेत आहे तोच सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या विरोधात बलात्कार केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेकडून उत्तर सोलापूर मतदारसंघातून निवडून आलेले आणि राज्यात मंत्रीपदी राहिलेले उत्तमप्रकाश खंदारे यांनी लग्नाचे आमिष दाखवत आणि मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देत बलात्कार केल्याचा मोठा आरोप या पिडीत महिलेने केला आहे. 


राज्यात शिवसेना पहिल्यांदा सत्तेत आली तेंव्हा सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री म्हणून खंदारे यांनी काम पाहिले होते. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातून ते आमदारपदी शिवसेनेकडून निवडून आले होते. त्यांच्याविरुद्ध पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार खंदारे यांनी लग्नाचे वचन देत शासकीय विश्रामगृहात बलात्कार केला. महिलेच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन देत चाकूचा धाक दाखवत या महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने नकार दिला असताना तिला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण करीत तिच्यावर बलात्कार केला. वारंवार बलात्कार केलाच शिवाय मुलांच्या संगोपनासाठी खंदारे यांनी देलेले बँकेचे धनादेश देखील वटले नाहीत. बलात्कारासह आपणास जीवे ठार मारण्याची धमकीही खंदारे यांनी दिली असल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. 


पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case file agains for raping a former minister uttamprakash khandare of Shiv Sena ६५ वर्षे वयाचे खंदारे यांच्यासह महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी आणि एका महिलेच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका माजी मंत्र्यावर हा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या प्रकरणाची चर्चाही होऊ लागली आहे.


   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !